बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवण्याआधी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कौशल्य दाखवले आहे. काही राज्यस्तरावर खेळले आहेत तर अनेक राष्ट्रीय स्तरावरही खेळले आहेत.
(instagram)बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार याने मार्शल आर्टमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. याशिवाय त्याला तायक्वांदोमध्येही ब्लॅक बेल्ट मिळाला आहे.
(instagram)अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी दीपिका पदुकोणने बॅडमिंटनमध्येही नाव कमावले होते. ती राष्ट्रीय स्तरावर देखील खेळली आहे.
(instagram)अभिनेता आमिर खान हा टेनिसपटू असून, त्याने महाराष्ट्र राज्य स्पर्धा देखील खेळली आहे.
(instagram)अभिनेता राहुल बोस हा एक रग्बी खेळाडू आहे. त्याने भारतासाठी रग्बी खेळ अनेकदा खेळला आहे. बरीच वर्षे खेळल्यानंतर त्याने २००९मध्ये निवृत्ती घेतली.
(instagram)अभिनेत्री नीतू चंद्रा तायक्वांदोमध्ये ५ वेळा राज्यस्तरीय सुवर्ण पदक विजेती आहे. याशिवाय नीतूने बिहारमधून बेसबॉल, सॉफ्टबॉल, नेटबॉल खेळले असून तिला बिहार सरकारच्या खेल सन्मान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
(instagram)बॉलिवूड अभिनेता साकिब सलीमने चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवण्यापूर्वी राज्यस्तरीय क्रिकेट खेळले आहे.
(instagram)'घुमर' या चित्रपटात काम केलेली सैयामी खेर खऱ्या आयुष्यात एक ॲथलीट आहे. ती बॅडमिंटन आणि टेनिस खेळली आहे.
(instagram)