राहण्यासाठी जगातील १० सर्वात परवडणारे देश
जर तुम्हाला कमी खर्चात चांगले जीवन जगायचे असेल, तर असे अनेक देश आहेत जिथे राहणीमान खूप परवडणारे आहे. राहणीमान, अन्न, वाहतूक आणि मनोरंजनाच्या कमी किमतीमुळे, हे देश केवळ पर्यटकांसाठीच नाही तर भटक्या आणि निवृत्त लोकांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अमेरिकन मासिक फोर्ब्सने इंटरनेशन्सने केलेल्या एक्सपॅट इनसाइडर २०२४ च्या सर्वेक्षणाचा हवाला देत म्हटले आहे की, सलग चौथ्या वर्षी व्हिएतनाम राहण्यासाठी जगातील सर्वात कमी खर्चीक देश म्हणून स्थान देण्यात आले आहे. जर तुम्ही मर्यादित बजेटमध्ये चांगली जीवनशैली शोधत असाल तर हे १० देश तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. जगातील १० स्वस्त देशांबद्दल जाणून घेऊया जिथे राहणे सोपे आणि आरामदायी असू शकते.
व्हिएतनाम :
व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील एक अत्यंत सुंदर आणि सर्वात कमी खर्चीक असणारा देश आहे. येथे राहण्याचा खर्च खूप कमी आहे. विशेषतः जर तुम्ही हनोई किंवा हो ची मिन्ह सिटीच्या बाहेर राहत असाल तर तुम्हाला येथे राहणे अतिशय स्वत: पडेल. येथील स्ट्रीट फूड प्रसिद्ध आहे. व ते तुलनेने स्वत: देखील आहेत. येथील जेवणाची चव अप्रतिम आहे आणि राहण्याचे भाडे तुलनेने कमी आहे. एका व्यक्तीला महिना ५००-७०० डॉलर्समध्ये या देशात आरामात राहता येते. यादीत व्हिएतनामचे स्थान सर्वात वर आहे. हा योगायोग नाही. जगभरात पर्यटणासाठी आणि राहण्यासाठी हा देश उत्तम आहे. ८६ टक्के परदेशी नागरिकांनी या देशातील राहणीमानाच्या खर्चाला अनुकूल रेटिंग दिले आहे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी अर्ध्या परदेशी लोकांचे म्हणणे आहे की व्हिएतनाममध्ये राहण्याचा खर्च परवडणाराय आहे, जो जागतिक सरासरी १२ टक्के दरा पेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.
कोलंबिया - दक्षिण अमेरिकेतील बजेट-फ्रेंडली देश
कोलंबियामध्ये राहण्याचा खर्च तुलनेने कमी आहे. बोगोटा आणि मेडेलिन सारख्या शहरांमध्ये परवडणाऱ्या किमतीत अपार्टमेंट उपलब्ध आहेत. अन्न आणि दळण वळण खर्च देखील स्वस्त असून येथील संस्कृती बरीच समृद्ध आहे. निवृत्त लोकांमध्येही हा देश खूप लोकप्रिय आहे.
इंडोनेशिया - नैसर्गिक सौंदर्य आणि राहणीमानाचा स्वस्त पर्याय
इंडोनेशिया, विशेषतः बाली, हा पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय देश आहे. येथे राहण्याचा खर्च अत्यंत कमी आहे, विशेषतः जर तुम्ही स्थानिक जेवण खाल्ले आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परवडणारी आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरे आणि टेकड्यांनी वेढलेला हा देश आरामदायी जीवन जगण्यासाठी चांगला पर्याय आहे.
पनामा - मध्य अमेरिकेतील स्वस्त आणि सुरक्षित देश
पनामा हा राहण्यासाठी चांगला देशांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये आहे. येथील कमी खर्चाचे राहणीमान, उत्कृष्ट आरोग्य सुविधा आणि आरामदायी जीवनशैली प्रसिद्ध आहे. येथे कर आणि रिअल इस्टेटच्या किमती इतर देशांपेक्षा कमी आहेत, ज्यामुळे परदेशी आणि निवृत्त नागरिक राहण्यासाठी या देशाला प्राधान्य देतात.
फिलीपिन्स :
फिलीपिन्समध्ये राहणे स्वस्त आहे. या देशात इंग्रजी मोठ्या प्रमाणात बोलली जाते, त्यामुळे येथे स्थायिक होणे सोपे होते. या किनारी देशात अन्न, वाहतूक आणि निवासाचा खर्च कमी आहे. येथे दरमहा सुमारे ७००-९०० डॉलर्समध्ये आरामात राहता येतं.
भारत - वैविध्यपूर्ण आणि बजेट-अनुकूल
भारत वैविध्य पूर्ण आणि राहण्यासाठी परवडणाऱ्या देशांपैकी एक आहे. दिल्ली, मुंबई, पुणे किंवा बेंगळुरू सारखी शहरे महाग असली तरी जयपूर, लखनौ, कोलकाता आणि इंदूर सारख्या शहरांमध्ये राहणे परवडणारे आहे. भारतीय खाद्य संस्कृती ही जगात प्रसिद्ध आहे. भरातात दरमहा ३००-६०० डॉलर्समध्ये आरामदायी जीवन जागता येतं.
मेक्सिको - लॅटिन अमेरिकेतील सर्वात चांगला देश
मेक्सिकोतील समुद्रकिनारे सुंदर आहेत. येथील खाद्य संस्कृती देखील जगात प्रसिद्ध आहे. येथील जीवनशैली खूप आरामदायी आणि परवडणारी आहे. आरोग्य सुविधा देखील चांगल्या आहेत आणि मोठ्या संख्येने पर्यटक या देशाला भेटी देत असतात.
थायलंड – आग्नेय आशियातील स्वस्त देश
थायलंड, विशेषतः बँकॉक, चियांग माई आणि फुकेत, येथील राहणीमान परवडणारे आहेत. येथील स्ट्रीट फूड स्वस्त आणि चविष्ट आहे आणि आरोग्य सेवा देखील चांगल्या आहेत. हा देश पर्यटकांमध्ये तसेच भटक्यांचा आवडता आहे.
ब्राझील - नैसर्गिक सौंदर्य आणि परवडणारी जीवनशैली
ब्राझीलमध्ये राहण्याचा खर्च तुलनेने कमी आहे, विशेषतः रिओ दि जानेरो आणि साओ पाउलोच्या बाहेर. येथे जेवण, राहण्याची व्यवस्था आणि वाहतूक सर्व काही परवडणारे आहे. समुद्रकिनारे आणि डोंगराळ प्रदेशाच्या सौंदर्यामुळे ते प्रवासी लोकांमध्ये लोकप्रिय आहे.