जगात असे अनेक विचित्र प्राणी आहेत, ज्यांच्याबद्दल कदाचित कोणालाच माहिती नसेल. आज आपण अशाच काही प्राण्यांबद्दल बोलणार आहोत.जर एखाद्याचे डोके त्याच्या शरीरापासून वेगळे केले गेले तर तो जिवंत राहणार नाही. पण जगात असे काही जीव आहेत जे डोक्याशिवायही जगू शकतात. चला तर मग पाहूया हे कोणते जीव आहेत. झुरळाच्या शरीराची रचना अशी असते की, त्याचे डोके कापले तरी ते जिवंत राहते. असे म्हणतात की झुरळ डोक्याशिवाय आठवडाभर जगू शकतो.
गोगलगायदेखील डोक्याशिवाय बरेच दिवस जगू शकते. गोगलगाय तोंडाने नव्हे तर शरीरातून श्वास घेतो, म्हणूनच त्याचे डोके कापले तरी ते जिवंत राहते.
सुमारे 75 वर्षांपूर्वी अमेरिकेत एक कोंबडा दीड वर्ष डोक्याशिवाय राहत होता, त्याचे नाव मिरॅकल माईक असे होते.