IPL 2024 चा थरार लवकरच सुरु होणार आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये फलंदाज आणि गोलंदाज आपापल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान देण्याचा प्रयत्न करतील. गेल्या मोसमात शुभमन गिलने ८९० धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. गिलसह अनेक खेळाडू या आयपीएलमध्ये दमदार करू शकतात. चला तर मग त्या खेळाडूंवर एक नजर टाकूया जे आयपीएल २०२४ मध्ये ऑरेंज कॅप जिंकू शकतात.
शुभमन गिल - शुभमन गिलने IPL 2023 मध्ये १७ सामन्यात ५९.३३ च्या उत्कृष्ट सरासरीने ८९० धावा केल्या, ज्यात ३ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. आता आयपीएल २०२४ पूर्वीही गिल चांगलाच फॉर्मात आहे. नुकतेच त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भरपूर धावा केल्या आहेत. तो याही आयपीएल मोसमात भरपूर धावा करू शकतो. यावेळी तो गुजरात टायटन्सचा कर्णधारही असेल, त्यामुळे त्याच्यावर अधिक धावा करण्याचे दडपण असेल.
विराट कोहली - ऑरेंज कॅपच्या शर्यतीतून विराट कोहलीला कधीच वगळले जाऊ शकत नाही. २०१० पासून सर्व आयपीएल हंगामात त्याने ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. गेल्या मोसमात त्याने ५२.२५ च्या सरासरीने ६३९ धावा केल्या होत्या. कोहलीने २०१६ मध्ये ९७३ धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती आणि यावेळी देखील तो खूप धावा करू शकतो.
ऋतुराज गायकवाड - ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२३ मध्ये एक मोठा खेळाडू म्हणून उदयास आला . त्याने गेल्या मोसमातील १६ सामन्यांमध्ये ५९० धावा केल्या होत्या. गायकवाडकडून चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तो एक खेळाडू म्हणून परिपक्व झाला आहे आणि यावेळेस त्याची कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली होऊ शकते.
यशस्वी जैस्वाल- यशस्वी जैस्वालही सध्या बॅटने धावांचा पाऊस पाडत आहे. गेल्या मोसमा त्ययाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १४ सामन्यात ६२५ धावा केल्या होत्या. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने सुमारे ७०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचा फॉर्म असाच राहिला तर तो ऑरेंज कॅप जिंकू शकतो,
जॉस बटलर - जोस बटलरला आयपीएल २०२३ मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण २०२२ मध्ये त्याने १७ सामन्यात ८६३ धावा केल्या होत्या. बटलर हा टी-२० फॉरमॅटमधील तज्ञ खेळाडूं आहे आणि त्याच्याकडे सामन्याचा निकाल कधीही बदलण्याची क्षमता आहे. बटलरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ३२२३ धावा केल्या आहेत. यावेळी तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरू शकतो.