India vs Bangladesh kanpur test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० ने जिंकली. मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे खेळला गेला. हा सामना भारताने ७ विकेट्सनी जिंकला. तर चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने २८० धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.
(1 / 6)
विशेष म्हणजे, कानपूर कसोटी चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. या कसोटीने क्रिकेट जगताला एक नवा दृष्टीकोन दिला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळली गेलेली ही कानपूर कसोटी अनेक अर्थांनी कायम लक्षात राहील.
(2 / 6)
कोणत्याही परिस्थिती विजय मिळवण्याची भुक- कानपूर कसोटीचा दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला होता. तर पहिल्या दिवशी केवळ ३४ षटकांचा खेळ झाला होता. अशा स्थितीत या कसोटीत केवळ दोन दिवसांचा वेळ शिल्लक उरला होता.टीम इंडियाच्या जागी इतर कोणताही संघ असता तर त्याने हार मानली असती. पण भारताने हे केले नाही. चौथ्या दिवशी सामना सुरू झाल्यापासूनच भारताला फक्त विजय हवा होता.(BCCI)
(3 / 6)
भारताची आक्रमक क्रिकेट खेळण्याची स्टाईल - भारताच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. भारताच्या पहिल्या डावातील पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांनी संघ काय विचार करत आहे आणि काय करणार आहे हे दाखवून दिले. विकेट पडत राहिल्या पण भारताने खेळण्याचा मार्ग बदलला नाही.(AFP)
(4 / 6)
रोहित शर्मानं दाखवली दिशा- या सामन्यात रोहित शर्माने दमदार सुरुवात केली. त्याने त्याच्या पहिल्या दोन चेंडूवर चेंडू ठोकले. त्याला मोठी खेळी खेळता आली नाही, पण त्याने आपल्या सहकाऱ्यांना दाखवून दिले की कसे खेळायचे. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून त्याने टीम इंडिया काय करणार आहे हे दाखवून दिले होते. यानंतर कर्णधारपद आणि क्षेत्ररक्षणातही रोहितच्या निर्णयांसमोर बांगलादेशने गुडघे टेकले.(AFP)
(5 / 6)
भारताची सर्वात जलद फलंदाजी- भारताने पहिल्या डावात कसोटीत सर्वात जलद ५०, १००, १५०,२०० आणि २५० धावा करण्याचा विक्रम केला. यासोबतच पहिला डाव ३५ षटकांत घोषित करून विक्रमही केला.(PTI)
(6 / 6)
अवघ्या दोन दिवसांत कसोटी सामन्याचा निकाल लावला - कधी कधी ५ दिवस सामना खेळूनही कसोटीचा निकाल लागत नाही. अशा स्थितीत भारताने अवघ्या दोन दिवसांत ४ इनिंगचा सामना जिंकला. आता जेव्हा जेव्हा कसोटी सामन्यांमध्ये किंवा कोणत्याही सामन्यात पावसामुळे खेळ खराब होईल, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे उदाहरण सर्वांच्या समोर असेल. (PTI)