बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १६ खेळाडूंची निवड केली. पहिल्या सामन्यात केवळ ११ खेळाडूंनाच संधी मिळू शकते.
(1 / 6)
अशा स्थितीत ५ खेळाडू बेंचवर बसतील. यामुळे प्लेइंग इलेव्हन निडवणे कठीण जाणार आहे. आपण येथे हेच पाहणार आहोत, की पहिल्या सामन्यात कोणत्या खेळाडूंना बेंचवर बसावे लागेल.
(2 / 6)
अक्षर पटेल- रवींद्र जडेजा खेळत असताना अक्षर पटेलला संधी मिळणे कठीण आहे. अक्षरचा चेंडू आणि बॅटने अप्रतिम रेकॉर्ड आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यांमध्ये अक्षर बेंचवर होता. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजासोबत कुलदीप आणि अश्विनला संधी मिळू शकते.
(3 / 6)
सरफराज खान- सरफराज खानला टीम इंडियात कायम ठेवण्यात आले आहे. त्याचा फिरकीविरुद्धचा रेकॉर्डही उत्कृष्ट आहे. मात्र, केएल राहुल पहिल्या कसोटीत खेळणार हे निश्चित दिसत आहे. राहुलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास सरफराजला बेंचवर राहावे लागेल.
(4 / 6)
आकाशदीप- आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ३ विकेट घेतल्या. त्या सामन्यात जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली होती. बुमराह बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार हे निश्चित आहे आणि अशा परिस्थितीत आकाश दीप फक्त बेंचवरच दिसू शकतो.
(5 / 6)
ध्रुव जुरेल- इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत ध्रुव जुरेलने फलंदाजीसोबतच किपिंगमध्येही कमाल केली. मात्र, आता ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. अशा स्थितीत पंत खेळणार हे निश्चित आहे आणि ध्रुव जुरेल बाहेर बसेल.
(6 / 6)
यश दयाल- भारतीय संघ मायदेशात कसोटी सामन्यांमध्ये फक्त दोन वेगवान गोलंदाजांना संधी देतो. १६ सदस्यीय संघात ४ वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. या स्थितीत आकाश दीपसोबत यश दयाल यालाही बेंचवर बसावे लागू शकते. बुमराहसोबत सिराज अंतिम ११ मध्ये दिसू शकतो.