भाऊ-बहिणीच्या ५ जोड्या ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, यातील दोन जोड्या अजूनही खेळत आहेत, पाहा-these 5 brother sister pairs who played international cricket happy raksha bandhan ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  भाऊ-बहिणीच्या ५ जोड्या ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, यातील दोन जोड्या अजूनही खेळत आहेत, पाहा

भाऊ-बहिणीच्या ५ जोड्या ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, यातील दोन जोड्या अजूनही खेळत आहेत, पाहा

Aug 19, 2024 03:10 PM IST
  • twitter
  • twitter
  • रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण. यामध्ये बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. रक्षाबंधनाच्या खासनिमित्ताने आज आपण अशा ५ भावा-बहिणीच्या जोडींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या देशासाठी क्रिकेट खेळले आहे.
रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात खास सणांपैकी एक आहे. यामध्ये बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. यासोबतच ती भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर दुसरीकडे, भाऊ आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तूही देतो. राखी पौर्णिमेनिमिमित्त आज आपण अशा ५ भावा-बहिणीच्या जोडींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या देशासाठी क्रिकेट खेळले आहे
share
(1 / 6)

पीटर मॅकग्लॅशन आणि सारा मॅक्ग्लॅशन (न्यूझीलंड)- सारा मॅक्ग्लॅशनने २००२ ते २०१६ दरम्यान न्यूझीलंडसाठी २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात २ कसोटी व्यतिरिक्त १३४ एकदिवसीय आणि ७६ टी 20 सामने सामील आहेत. तिच्या नावावर जवळपास ३५०० धावा आहेत. तर पीटर मॅकग्लॅशन याने ४ एकदिवसीय आणि ११ टी-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले.
share
(2 / 6)

नॅथन ॲस्टल आणि लिसा ॲस्टल (न्यूझीलंड)- कोणत्या क्रिकेट चाहत्याला नॅथन ॲस्टलचे नाव माहीत नाही? तो न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आहे. कसोटीत सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ॲस्टलच्या नावावर आहे. नॅथनची बहीण लिसा ॲस्टल हिनेही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
share
(3 / 6)

एड जॉयस, डोम जॉयस आणि इसोबेल जॉइस, सेसेलिया जॉइस (आयर्लंड)- आयर्लंडच्या जॉयस कुटुंबात ४ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. एड जॉयस इंग्लंडकडूनही खेळला आहे. तर डोमला आयर्लंडकडून ३ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली.  त्यांच्या दोन्ही बहिणी इसोबेल आणि सेसेलिया यांनी बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. इसोबेलने १ कसोटी, ७९ वनडे आणि ५५ टी-२० सामने खेळले आहेत. तर सेसेलियाला १०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे.
share
(4 / 6)

विल सदरलँड आणि ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया)- ॲनाबेल सदरलँड ही ऑस्ट्रेलिया महिला संघाची आघाडीची अष्टपैलू खेळाडू आहे. तिने अलीकडेच एका कसोटीत द्विशतक झळकावले होते. गोलंदाजीतही सरदलँडच्या नावावर ५९ विकेट आहेत. ती WPL मध्येही खेळते. ॲनाबेलचा भाऊ विल सदरलँड याला यावर्षी ऑस्ट्रेलियाकडून २ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या नावावर १८ धावा आणि २ विकेट आहेत.
share
(5 / 6)

हॅरी टेक्टर आणि ॲलिस टेक्टर (आयर्लंड)- हॅरी टेक्टर हा आयर्लंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने ४५ सामन्यात ५० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तो वनडे क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच, हॅरीची बहीण ॲलिस टेक्टरने श्रीलंकेविरुद्ध आयर्लंडकडून वनडे पदार्पण केले.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज