'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्ही जगतातील सर्वाधिक पसंत केला गेलेला टीव्ही शो आहे. त्यातील प्रत्येक पात्राने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील ‘जेठालाल’चे पात्र लोकांना खूप आवडले आहे. अभिनेते दिलीप जोशी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये ‘जेठालाल’ची भूमिका साकारली आहे. या व्यक्तिरेखेने दिलीप जोशी यांना नाव आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवून दिले आहे. आज दिलीप जोशी यांना लोक ‘जेठालाल’ म्हणून ओळखतात.
मात्र, हे जाणून आश्चर्य वाटेल की, दिलीप जोशींपूर्वी आणखी पाच अभिनेत्यांना या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. परंतु, या सर्वांनी वेगवेगळ्या कारणांमुळे शो नाकारला. चला जाणून घेऊया कोण आहेत ते पाच कलाकार ज्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालची भूमिका विचारण्यात आली होती.
एहसान कुरेशी : कॉमेडियन एहसान कुरेशीला ‘जेठालाल’ची भूमिका ऑफर करण्यात आली होती. एहसान कुरेशीला 'द ग्रेट इंडियन लाफ्टर शो' मधून ओळख मिळाली. एहसान कुरेशीने जेठालालची भूमिका का नाकारली, याचे कोणतेही कारण कधी समोर आले नाही. सध्या एहसान कुरेशी देशभरात कॉमेडी शो करतो.
किकू शारदा : किकू शारदाला त्यावेळी कोणत्याही डेली सोपमध्ये काम करायचे नव्हते. त्यामुळेच त्याने जेठालालची भूमिका नाकारली. किकू शारदा सध्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’मध्ये दिसत आहे.
अली असगर : ‘द कपिल शर्मा शो’सह अनेक कॉमेडी मालिकांमध्ये दिसलेल्या अली असगरलाही जेठालालच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. मात्र, त्याच्या इतर कामामुळे त्याने ही भूमिका नाकारली. अली सध्या त्याच्या इन्स्टा अकाउंटवर खूप सक्रिय आहे.
योगेश त्रिपाठी : योगेश त्रिपाठी सध्या ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत काम करत आहे. त्यानेही जेठालालची भूमिका करण्यासही नकार दिला होता.