भोगराजू पट्टाभी सीतारामय्या हे स्वातंत्र्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. १९४८ ते १९४९ पर्यंत ते या पदावर राहिले.
(Congress/ Twitter)स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाचे नेते पुरुषोत्तम दास टंडन हे १९४९ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते १९५१ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष होते.
(Congress/ Twitter)१९५५ मध्ये कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं यूएन ढेबर यांच्याकडे आली. ते १९५९ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. १९५२ साली भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यानंतर ढेबर यांनी खऱ्या अर्थानं कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेला आकार दिला.
(Hindustan Coca-Cola Beverages/ Twitter)त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी १९६० ते १९६३ या कालावधीत कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपद संभाळलं.
(Vice President of India/ Twitter)रेड्डी यांच्यानंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ के कामराज यांच्या गळ्यात पडली. कामराज हे १९६४ ते १९६७ या कालावधीत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मतभेदांमुळं त्यांच्या अध्यक्षपदाची कारकिर्द चांगलीच गाजली होती.
(Indian National Congress)त्यानंतर एस. निजलिंगप्पा हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. ते १९६८ ते १९७० या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
(indianhistorypics/ Twitter)माजी उपपंतप्रधान जगजीवन राम हे देखील १९७० ते १९७१ या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
(Randeep Surjewala/ Twittter)माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी १९७२ ते १९७४ या काळात काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं.
(Rajyavardhan Rathore/ Twitter)त्यानंतर जेष्ठ नेते देवकांत बरुआ हे कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. १९७५ ते १९७७ असा त्यांचा कार्यकाळ होता. ‘इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इन इंडिया’ ही प्रसिद्ध घोषणा बरुआ यांनीच दिली होती. याशिवाय देशात लागलेल्या आणीबाणीच्या काळात ते कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिले होते.
( Nandan Pratim Sharma Bordoloi/ Twitter)राजीव गांधी यांच्याकडून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी कॉंग्रेस पक्षाची सूत्रं हातील घेतली. ते १९९२ ते १९९४ या काळात कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.
(@AgentSaffron/ Twitter)सीताराम केसरी हे काँग्रेस पक्षाचे शेवटचे बिगरगांधी अध्यक्ष होते. त्यांनी १९९६ ते १९९८ पर्यंत कॉंग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतर अद्याप बिगरगांधी घराण्याकडे कॉंग्रेसचं अध्यक्षपद गेलेलं नाही.
(Wikipedia)त्यानंतर आता अलीकडेच कॉंग्रेसनं अध्यक्षपदाची निवडणूक घेणार असल्याचं जाहीर केलंय. या निवडणुकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर हे आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं जर या दोन नेत्यांमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर कॉंग्रेसला तब्बल २४ वर्षांनंतर बिगरगांधी घराण्याचा अध्यक्ष मिळेल.
(Shashi Tharoor (Twitter))