cash rich companies : भारतातील 'या' १० कंपन्यांकडं आहे सर्वाधिक रोकड; आकडे ऐकून थक्क व्हाल!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  cash rich companies : भारतातील 'या' १० कंपन्यांकडं आहे सर्वाधिक रोकड; आकडे ऐकून थक्क व्हाल!

cash rich companies : भारतातील 'या' १० कंपन्यांकडं आहे सर्वाधिक रोकड; आकडे ऐकून थक्क व्हाल!

cash rich companies : भारतातील 'या' १० कंपन्यांकडं आहे सर्वाधिक रोकड; आकडे ऐकून थक्क व्हाल!

Jul 08, 2024 05:05 PM IST
  • twitter
  • twitter
Top 10 cash rich companies : कंपनीच्या आर्थिक मजबुतीचा एक निदर्शक म्हणजे कंपनीकडं असलेला रोकड रकमेचा साठा. भारतात कोणत्या कंपन्यांकडं हा साठा सर्वाधिक आहे. पाहूया पहिल्या १० कंपन्यांची यादी.
रोकड रकमेचा अतिरिक्त साठा असणं हे प्रत्येक कंपनीसाठी नेहमीच फायदेशीर ठरतं. कंपनी आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे याचं ते एक निदर्शक असतं. त्यामुळं गुंतवणूकदारही पटकन आकर्षित होतात. भारतात कोणत्या १० कंपन्यांकडं सर्वाधिक रोकड आहे? जाणून घेऊया. ही आकडेवारी ३१ मार्च २०२४ पर्यंतची असून कंपन्या आणि ब्लूमबर्गच्या वार्षिक अहवालातून घेण्यात आली आहे. वाचा संपूर्ण यादी.
twitterfacebook
share
(1 / 11)

रिलायन्स इंडस्ट्रीजकडे २.१ लाख कोटी रुपये रोख स्वरूपात आहे. देशातील सर्व कंपन्यांपेक्षा हा आकडा जास्त आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सनं आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सर्वाधिक ९ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.
twitterfacebook
share
(2 / 11)

टाटा मोटर्सकडे रोख स्वरूपात ६०,०६० कोटी रुपये आहेत. राखीव रोख रकमेच्या बाबतीत टाटा मोटर्स रोख ही दुसऱ्या स्थानावर आहे. टाटा मोटर्सचा भारतीय व्यवसाय कर्जमुक्त झाला आहे आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये एकत्रित आधारावर पूर्ण (ऑटोमोटिव्ह) कर्जमुक्त होण्याची अपेक्षा आहे.
twitterfacebook
share
(3 / 11)

लार्सन अँड टुब्रोकडे ५०,३१६ कोटी रुपयांची रोख रक्कम आहे. कंपनीनं चालू वर्षात आतापर्यंत मजबूत ऑर्डर मिळवल्या आहेत. हा आकडा ३ लाख कोटी रुपयांच्या पुढं गेला आहे. मार्च २०२४ अखेर कंपनीची ऑर्डर बुक ४.८ लाख कोटी रुपये होती.
twitterfacebook
share
(4 / 11)

Tata Consultancy Services : टीसीएसकडे रोख रुपये ४४,२९६ कोटी आहेत. भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये सर्वात जास्त रोख रक्कम असेलली ही कंपनी आहे. टीसीएस या यादीत चौथ्या स्थानावर आहे आणि टाटा मोटर्स नंतर टाटा समूहाची दुसरी कंपनी आहे.
twitterfacebook
share
(5 / 11)

ONGC : ओएनजीसीकडं ४२०७० कोटी रुपयांची रोख रक्कम आहे. वर्षभरात ओएनजीसीचा निव्वळ नफा जवळपास ४० टक्क्यांनी वाढून ४९२२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
twitterfacebook
share
(6 / 11)

विप्रोकडे ४०८१२ कोटी रुपयांची रोकड आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील चौथी मोठी कंपनी असलेली विप्रो रोक रकमेच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे.
twitterfacebook
share
(7 / 11)

Infosys : इन्फोसिसकडे रोख आणि रोख समतुल्य मिळून ३९००५ कोटी रुपये आहेत. यात ६५२९ कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे. २०२४ या आर्थिक वर्षात इन्फोसिसचा निव्वळ नफा ९ टक्क्यांनी वाढून २६२३३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
twitterfacebook
share
(8 / 11)

इंटरग्लोब एव्हिएशनकडे रोख आणि रोख समतुल्य मिळून ३४,७३८ कोटी रुपये आहेत. मार्केट कॅपनुसार, जगातील तिसरी सर्वात मोठी एअरलाइन असलेल्या इंडिगोकडं मार्च २०२४ पर्यंत एकूण ३४७३८ कोटी रुपयांची रोकड होती.
twitterfacebook
share
(9 / 11)

कोल इंडियाकडे ३३,४८६ कोटी रुपयांची रोख आणि रोख समतुल्य रक्कम आहे. कोल इंडिया ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लाभांश देणारी सरकारी कंपनी आहे. रोकड साठ्याच्या बाबतीत ही कंपनी ९ व्या क्रमांकावर आहे.
twitterfacebook
share
(10 / 11)

HCL Technologies कडे रोख आणि रोख समतुल्य रुपये २७९७५ कोटी आहेत. ही भारतातील सूचीबद्ध कंपन्यांमध्ये तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.
twitterfacebook
share
(11 / 11)

इतर गॅलरीज