आपण आजवर केळी खाण्याचे फायदे पाहिले आहेत. अनेकदा डॉक्टर स्वत: केळी खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्ही कधी कच्ची केळी खाल्ली आहेत का? कच्ची केळी हे बेचव असतात. त्यामुळे फार कमी लोक ती खातात. पण हिच कच्ची केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? आरोग्यासाठी कच्ची केळी ही अतिशय गुणकारी असतात. चला जाणून घेऊया कच्ची केळी खाण्याचे फायदे…
कच्च्या केळीमध्ये फायबरचे प्रमाण हे खूप जास्त असते. त्यामुळे पचनासंबंधी असलेल्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होता. त्यामुळे ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांनी कच्ची केळी खावीत.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील अनेकदा डॉक्टर कच्ची केळी खाण्याचा सल्ला देतात. तसेच त्वचेवर चमक येण्यासाठी देखील कच्ची केळी खाल्ली जातात.