Ishan Kishan: द्विशतकानंतरही इशानला संधी नाही; या ५ खेळाडूंना मिळालीय सावत्र वागणूक, पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ishan Kishan: द्विशतकानंतरही इशानला संधी नाही; या ५ खेळाडूंना मिळालीय सावत्र वागणूक, पाहा

Ishan Kishan: द्विशतकानंतरही इशानला संधी नाही; या ५ खेळाडूंना मिळालीय सावत्र वागणूक, पाहा

Ishan Kishan: द्विशतकानंतरही इशानला संधी नाही; या ५ खेळाडूंना मिळालीय सावत्र वागणूक, पाहा

Published Jan 09, 2023 09:24 PM IST
  • twitter
  • twitter
  • team india unlucky players: भारत-श्रीलंका वनडे मालिकेला मंगळवारपासून (१० जानेवारी) सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद झाली. यात त्याने प्लेईंग ११ बाबत खुलासा केला. याआधीच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनल उद्याच्या सामन्यात संधी मिळणार नाही. दरम्यान, ईशान हा पहिला खेळाडू नाही, ज्याला दमदार कामगिरीनंतरही पुढच्या सामन्यात संधी मिळाले नाही. यापूर्वीही अनेक खेळाडूंना अशी सावत्र वागणूक मिळाली आहे.जाणून घ्या त्या खेळाडूंबद्दल
ishan kishan- भारतीय संघ मंगळवारी (१० जानेवारी) श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात इशान किशन प्लेइंग इलेव्हनमध्ये नसेल. इशानने यापूर्वीच्या वनडे सामन्यात बांगलादेशविरुद्ध द्विशतक ठोकले होते. हे वनडेतले सर्वात वेगवान द्विशतक होते. मात्र, असे असूनही इशानऐवजी शुभमन गिल हा कर्णधार रोहित शर्मासोबत ओपिनंग करणार आहे. 
twitterfacebook
share
(1 / 7)

Irfan Pathan- भारतीय संघ २०१२ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. मालिकेतील शेवटच्या सामन्यात इरफान पठाणने २९ धावा केल्या होत्या. तसेच, ५ फलंदाजांना बाद केले होते. तो सामना भारताने जिंकला. चांगली कामगिरी करून देखील पठाणला पुढच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. तो त्याच्या करिअरचा शेवटचा एकदिवसीय सामना ठरला.
twitterfacebook
share
(2 / 7)

Sanju Samson- टीम इंडिया जूनमध्ये आयर्लंडच्या दौऱ्यावर होती. संजूने टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ७७ धावांची इनिंग खेळली. त्याने ४२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले. यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध पुढील सामना खेळला. मात्र, त्या सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
twitterfacebook
share
(3 / 7)

Karun Nair- भारतासाठी कसोटीत त्रिशतक झळकावणारा करुण नायर हा केवळ दुसरा फलंदाज आहे. त्याच्याशिवाय फक्त वीरेंद्र सेहवागलाच कसोटीत ३०० पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. २०१६ च्या चेन्नई कसोटीत नायरने इंग्लंडविरुद्ध नाबाद ३०३ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर पुढील कसोटी मालिका भारत बांगलादेशविरुद्ध  खेळला. मात्र, त्या मालिकेत करुण नायरला बेंचवरच बसावे लागले.
twitterfacebook
share
(4 / 7)

Kuldeep Yadav- या सर्वांमध्ये ताजे उदाहरण फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे आहे. गेल्या महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर पहिल्या कसोटीत कुलदीपने फलंदाजीत ४० धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत ८ फलंदाज बाद केले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. पण पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. 
twitterfacebook
share
(5 / 7)

Bhuvneshwar Kumar- २०१८च्या सुरुवातीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत गेला होता. भुवनेश्वर कुमारने पहिल्या कसोटीत पहिल्या ३ षटकात ३ विकेट घेतल्या. त्या सामन्यात त्याने एकूण ६ विकेट्स घेतल्या आणि बॅटने ३८ धावाही केल्या. यानंतरही त्याला दुसऱ्या सामन्यातून वगळण्यात आले. तिसऱ्या सामन्यात पुनरागमन करत त्याने सामना जिंकून देणारी कामगिरी केली. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे, त्या सामन्यानंतर आजपर्यंत भुवीने एकही कसोटी खेळलेली नाही.  
twitterfacebook
share
(6 / 7)

team india unlucky players
twitterfacebook
share
(7 / 7)

team india unlucky players

इतर गॅलरीज