मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  उन्मुक्त चंद ते पृथ्वी शॉ… या ५ खेळाडूंनी अंडर-१९ वर्ल्डकप गाजवला, पण नंतर फ्लॉप ठरले, पाहा

उन्मुक्त चंद ते पृथ्वी शॉ… या ५ खेळाडूंनी अंडर-१९ वर्ल्डकप गाजवला, पण नंतर फ्लॉप ठरले, पाहा

Jan 21, 2024 10:46 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • U19 World Cup Star : विराट कोहली, युवराज सिंग आणि इशान किशन यांसारख्या खेळाडूंना अंडर-१९ विश्वचषकातून मोठी ओळख मिळाली. पण अशा खेळाडूंचीही एक मोठी यादी आहे, जे अंडर १९ वर्ल्डकपमध्ये हिरो ठरले पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास काही करू शकले नाहीत.

उन्मुक्त चंद - टीम इंडियाने २०१२ चा अंडर-१९ विश्वचषक उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वात जिंकला होता. उन्मुक्त चंदने या वर्ल्डकपमध्ये ६ सामन्यात १ शतक आणि १ अर्धशतकासह २४६ धावा केल्या होत्या. तो भारताचा पुढचा स्टार मानला जात होता. पण तो आयपीएलमध्ये फ्लॉप ठरला आणि टीम इंडियात येऊ शकला नाही.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

पृथ्वी शॉ- पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०१८ चा अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. त्याने ६ सामन्यात १६१ धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय चाहत्यांना पृथ्वी शॉकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. यानंतर पृथ्वी शॉ टीम इंडियातदेखील आला आणि भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला. पण तो फार काळ टिकू शकला नाही. काही सामन्यांमध्ये फ्लॉप राहिल्याने त्याला संघातून वगळण्यात आले. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

प्रियम गर्ग- प्रियम गर्ग २०२०च्या अंडर-१० विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार होता. त्यावेळी प्रियम गर्गने आपल्या खेळाने खूप प्रभावित केले होते. यानंतर त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली, पण हा फलंदाज फ्लॉप ठरला. प्रियम गर्गच्या नावावर आयपीएलमधील २३ सामन्यांमध्ये २७३ धावा आहेत.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

राज अंगद बावा - राज अंगद बावा हा भारतीय अंडर-१९ संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू होता. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये राज अंगद बावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. २०२२ च्या अंडर-१९ विश्वचषकात राजने ६ सामन्यात २५१ धावा आणि ९ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर लगेचच पंजाब किंग्सने त्याला २ कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन करारबद्ध केले. पण त्याला आयपीएलमध्ये तेवढी संधी मिळाली नाही आणि आता तो कुठेच दिसत नाही.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

यश धूल- टीम इंडियाने २०२२ चा अंडर १९ वर्ल्डकप यश धुल याच्या नेतृत्वात जिंकला होता. धूलने अवघ्या ४ सामन्यात १ शतक आणि १ अर्धशतकासह २२९ धावा केल्या. यानंतर त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केले. मात्र, यशला अद्याप आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

यश धूल- टीम इंडियाने २०२२ चा अंडर १९ वर्ल्डकप यश धुल याच्या नेतृत्वात जिंकला होता. धूलने अवघ्या ४ सामन्यात १ शतक आणि १ अर्धशतकासह २२९ धावा केल्या. यानंतर त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केले. मात्र, यशला अद्याप आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही.

WhatsApp channel

इतर गॅलरीज