(4 / 7)पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे सकाळी ८.०० वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून ६ हजार ६९३ क्यूसेक व विद्युत निर्मिती गृहद्वारे ६०० क्यूसेकसेक असा एकूण ७ हजार २९३ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.