मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  इफ्तार पार्टीत पोहोचल्यामुळे ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा ट्रोल! सणसणीत उत्तर देताना अभिनेत्री म्हणते...

इफ्तार पार्टीत पोहोचल्यामुळे ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा ट्रोल! सणसणीत उत्तर देताना अभिनेत्री म्हणते...

Apr 06, 2024 11:01 AM IST Harshada Bhirvandekar

काही दिवसांपूर्वी अदा एका इफ्तार पार्टीला पोहोचली होती. हिंदू असून, इफ्तार पार्टीत गेल्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अदाने ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’ आणि ‘बस्तर द नक्सल स्टोरी’सारखे चित्रपट केले आहेत. या चित्रपटांनंतर तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. मात्र, आता अभिनेत्री ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी अदा एका इफ्तार पार्टीला पोहोचली होती. हिंदू असून, इफ्तार पार्टीत गेल्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात येत आहे. इतकेच नाही तर तिला सोशल मीडियावर ‘अदा खान’ असे म्हटले जात होते. यावर आता अदा शर्माने सणसणीत उत्तर दिले आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अदाने ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द केरला स्टोरी’ आणि ‘बस्तर द नक्सल स्टोरी’सारखे चित्रपट केले आहेत. या चित्रपटांनंतर तिची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. मात्र, आता अभिनेत्री ट्रोल होत आहे. काही दिवसांपूर्वी अदा एका इफ्तार पार्टीला पोहोचली होती. हिंदू असून, इफ्तार पार्टीत गेल्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात येत आहे. इतकेच नाही तर तिला सोशल मीडियावर ‘अदा खान’ असे म्हटले जात होते. यावर आता अदा शर्माने सणसणीत उत्तर दिले आहे.(All Photos: Instagram)

नुकत्याच एका मुलाखतीत अदाला विचारण्यात आले की, ती इफ्तार पार्टीला गेल्यावर बराच वाद निर्माण झाला होता. काहींनी ती अदा शर्मा नसून, अदा खान असल्याचे देखील उपहासात्मक म्हटले होते. काही लोकांनी अदा शर्मा इफ्तार पार्टीला का गेली, असे विचारले... यावर तुमचे काय म्हणणे आहे. यावर अदाने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत काम करत आहे. इथे प्रत्येक धर्म आणि समुदायाचे लोक आहेत. मलाही माझ्या धर्मावर खूप विश्वास आहे, पण याचा अर्थ मी इतर कोणत्याही धर्माला दुजाभाव देईन, असे नाही.’
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

अदा पुढे म्हणाली, 'माझ्या आई-वडिलांनी मला शिकवले की, आपण प्रत्येक सजीव, प्राणी असो किंवा मानवासोबत चांगले जगले पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर मला अदा खान म्हणत असाल, तर तुम्ही केरला स्टोरीची विचारप्रक्रिया दाखवत आहात. तुम्ही तुमची विचारसरणी दाखवत आहात. मी कार्यक्रमात सामान्य सलवार सूट घातला होता, बुरखा नव्हे. आणि राहिला प्रश्न मी नॉनव्हेज खाण्याचा, तर मी साधा कांदा देखील खात नाही. तर तो प्रश्नच येत नाही... मी लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही.’
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

शेवटी अदा शर्मा म्हणाली की, 'मी ट्रोलिंगकडे जास्त लक्ष दिले नाही. कारण मला दुसऱ्या दिवशी एका महत्त्वाच्या शूटसाठी जायचे होते आणि मला माझ्या मनात कोणताही तणाव नको होता.' अदा शर्मा आता 'द गेम ऑफ गिरगिट' या चित्रपटात दिसणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट 'द केरला स्टोरी' हा २०२३मध्ये प्रदर्शित झाला होता. तिचा हा चित्रपट प्रदर्शित होताच, याविषयी बराच गदारोळ निर्माण झाला होता. अनेकांनी याला प्रपोगांडा चित्रपट म्हणत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. मात्र, तरीही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला होता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट 'द केरला स्टोरी' हा २०२३मध्ये प्रदर्शित झाला होता. तिचा हा चित्रपट प्रदर्शित होताच, याविषयी बराच गदारोळ निर्माण झाला होता. अनेकांनी याला प्रपोगांडा चित्रपट म्हणत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली होती. मात्र, तरीही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला होता.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज