हा देश २०११ पर्यंत दिला जायचा भाड्याने : हा देश २०११ पर्यंत भाड्याने देण्याची योजना सरकारने सुरू ठेवली होती. येथील घरे, कार आणि अगदी रेफ्रिजरेटर व एअर कंडिशनर यांसारख्या अनेक अनोख्या गोष्टी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना भाड्याने दिल्या जायच्या. लिकटेंस्टीन हा युरोपमधील एक छोटासा देश येथील राजा हा २०११ पर्यंत एका रात्रीसाठी भाड्याने दिला जात होता.
एका रात्रीचे भाडे किती होते? : लिकटेंस्टीन हा देश स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या देशांच्यामध्ये आहे. देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी २०११ पर्यंत होमस्टे सेवा भाड्याने दिली जात होती. केवळ १६० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या हा देश एका रात्रीसाठी भाड्याने घेण्यासाठी सुमारे ६० लाख रुपये द्यावे लागत होते.
राजा स्वतः चाव्या द्यायला यायचा : जो कोणी हा देश एका रात्रीसाठी भाड्याने घ्यायचा त्या व्यक्तीला येथील राजा हा स्वत: चाव्या द्यायचा. लिक्टेंस्टीनच्या चाव्या राजा, प्रिन्स हंस-ॲडम दोन याने वैयक्तिकरित्या भाड्याने हा देश घेणाऱ्यांना सुपूर्द केल्या आहेत. या पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात येत असे. पाहुण्यांना सहज फिरता यावे म्हणून रस्त्याच्या कडेला मोठमोठे पोस्टर लावण्यात आले होते.
स्नूप डॉग हे प्रसिद्ध रॅप गाणे रद्द : पाहुण्यांच्या स्वागतात राजा स्वतः भाग घेत असे. आल्प्समध्ये पाहुण्यांसाठी फटाके, विशेष मेजवानी आणि खाजगी कार्यक्रमांचीही व्यवस्था करण्यात येत असे. प्रसिद्ध रॅप गायक स्नूप डॉगने एकदा लिक्टेनस्टीनला त्याचा संगीत व्हिडिओ शूट करण्यासाठी बूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळेवर बुकिंग न केल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
ही योजना का बंद करण्यात आली ? ही योजना अगदी अनोखी असली तरी २०११ नंतर ती बंद करण्यात आली. त्याचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने ही सुविधा बंद केली होती.
ही मनोरंजक परंपरा अद्वितीय : लिकटेंस्टीन हा युरोपमधील चौथा सर्वात लहान देश आहे, ज्याची लोकसंख्या फक्त ४० हजार आहे. ही अर्ध-संवैधानिक राजेशाही आहे आणि तिच्यावर कोणतेही बाह्य कर्ज नाही. १६,००० हेक्टरमध्ये पसरलेला हा देश आपल्या सौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. हा देश आता भाड्याने उपलब्ध नाही. मात्र, येथील आठवणी कायम लक्षात राहणाऱ्या आहेत.