Actress Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी हिने अतिशय मेहनतीने हे स्थान मिळवलं आहे. या प्रवासात तिच्यासमोर अनेक अडचणी आल्या.
(1 / 5)
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. 'पुढचं पाऊल'मधून घराघरांत पोहोचलेली जुई गडकरी आता 'ठरलं तर मग' या मालिकेमधून सगळ्यांची लाडकी बनली.
(2 / 5)
अभिनेत्री जुई गडकरी हिने अतिशय मेहनतीने हे स्थान मिळवलं आहे. या प्रवासात तिच्यासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र, तिने सगळ्यावर मात करत मेहनत केली. दररोज तीन तासांचा प्रवास करून ती कर्जतहून मालाडला कामासाठी यायची.
(3 / 5)
याच दरम्यान तिला एका जीवघेण्या आजाराने ग्रासलं. मात्र, या आजारावर मात करत जुईने पुन्हा नव्याने सुरुवात केली. या सगळ्या प्रवासात जुईला अनेकदा बॉडी शेमिंगलाही समोरं जावं लागलं. यावेळी तिला स्वतःबद्दल एक असा आरोप कानावर पडला, ज्यामुळे ती हादरून गेली.
(4 / 5)
‘काळी सावळी, बारीक’ असं म्हणून तिला अनेकदा हिणवलं होतं. मात्र, एका व्यक्तीने अशी कमेंट केली होती की, ‘सायली मुलांना नाडी लावते.’ हे ऐकून जुई गडकरी खचून गेली होती.
(5 / 5)
स्वतःबद्दलच हे बोलण ऐकून जुई गडकरी हिला मोठा धक्का बसला होता. कधीच कुणाच्या अध्यामध्यात नसलेली जुई घरी जाऊन खूप रडली होती.