
न्यूयॉर्कमधील थँक्सगिव्हिंग परेडमधील प्रात्यक्षिकातील एक दृश्य.. अवघ्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर नागरिक या दिवशी उत्साहात रस्त्यावर उतरतात. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा शुक्रवार थँक्सगिव्हिंग डे म्हणून साजरा केला जातो.
(AP)अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन मॅसॅच्युसेट्समधील नॅनटकेटमध्ये थँक्सगिव्हिंग डेवर नॅनटकेट फायर डिपार्टमेंटला भेट देताना. हा दिवस अमेरिकेत सार्वजनिक सुटी म्हणून घोषित केला गेला आहे. अमेरिकेत ही एक अधिकृत सार्वजनिक सुट्टी आहे
(AP)लॉस एंजेलिसमधील हजारो बेघर लोक राष्ट्रीय दिनानिमित्त युनियन रेस्क्यू मिशनने दिलेल्या मोफत भोजनाला उपस्थित होते.आजचा दिवस या लोकांसाठी अत्यंत खास दिवस होता.
(AP)व्हेनेझुएलातील स्थलांतरित मुलांना मेक्सिकोतील सिउदाद जुआरेझ येथे रिओ ब्राव्हो नदीच्या काठावरील शिबिरात थँक्सगिव्हिंग डे जेवण मिळते.जगभरात आजही अनेक मुलांना किंवा नागरिकांना दोनवेळ जेवण मिळत नसल्याचं सत्यही या निमित्ताने समोर आलं.
(REUTERS)
