Thane Encroachment : येऊरमधील बॉम्बे डक हॉटेलच्या अतिक्रमणावर महापालिकेचा अखेर हातोडा, PHOTOS
Thane Encroachment : ठाणे महापालिकेने येऊर येथील बॉम्बे डक हॉटेलवर कारवाई करत अतिक्रमण काढले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येऊर येथील अतिक्रमणाचा मुद्द गाजत होता.
(1 / 5)
ठाण्यातील येऊर येथील अनाधिकृत हॉटेल, लॉन्सवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह स्थानिकांनी आवाज उठविल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येऊर येथील बॉम्ब डक या हॉटेलच्या अनाधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई केली. (प्रफुल्ल गांगुर्डे)
(2 / 5)
ठाणे शहरात अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. त्यानंतर मागील काही दिवसापासून येऊर येथील वाढत्या अतिक्रमणांमुळे देखील येऊरचा बळी जात असल्याचा मुद्दा विरोधकांनी उठवला होता.
(3 / 5)
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी येथील बॉम्बे डक या हॉटेलमधील वाढीव अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली.
(4 / 5)
वर्तक नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
(5 / 5)
महापालिकेच्या कारवाईवेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बॉम्बे डक हॉटेल मालकाला दोन महिन्यापूर्वी वाढीव अनाधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही त्याने वाढीव बांधकाम न काढल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली.
इतर गॅलरीज