बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून क्रिती सेनॉन ओळखली जाते. मनोरंजन विश्वाशी संबंधित नसतानाही क्रिती सेनन आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. क्रितीने तिच्या दमदार अभिनयाने फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे क्रितीकडे एकूण किती संपत्ती आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
क्रितीने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यापूर्वी ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना दिसत होती.
हिरोपंती चित्रपटानंतर क्रितीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. तिने चित्रपटांसाठी तगडे मानधन घेतले आहे.
क्रिती काही ब्रँडची अॅम्बेसिडर आहे. तर तिने काही ब्रँडच्या जाहिरांतीमध्ये देखील काम केले आहे.