Summer Heat In Maharashtra : हिवाळा संपल्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भात तर फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे.
(HT)विदर्भाची राजधानी असलेल्या नागपुरात तापमान ३७ सेल्सिअसवर पोहचलं आहे. याशिवाय अकोल्यात ३८, अमरावतीत ३६, बुलढाण्यात ३५, चंद्रपुरात ३६ आणि वाशिमध्ये ३८ सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचलं आहे.
(REUTERS)फक्त विदर्भच नाही येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचं तापमान झपाट्यानं वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
(HT)मुंबईसह कोकणाचं तापमान वाढण्याची शक्यता असल्यामुळं आता नागरिकांना प्रखर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.
(Yogendra Kumar)