Maharashtra Weather Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा तसेच विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
(HT)Weather Update Maharashtra : अवकाळी पावसानंतर आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
(HT)मुंबईसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं कधी पाऊस तर कधी कडक ऊन असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.
(HT)विदर्भ आणि मराठवाड्यातही उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळं गेले दोन दिवस पावसाने सुखावलेल्या सामान्यांना पुन्हा उकाड्याने हैराण केलं आहे.
(HT)कोकण वगळता राज्यातील उर्वरीत भागांमध्ये पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
(HT)