Telangana CM KCR In Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रात निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. नांदेडमध्ये जाहीर सभा घेत त्यांनी दलितांसाठी मोठी घोषणा केलीय.
(1 / 4)
Telangana Chief Minister KCR In Nanded Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज नांदेडमध्ये सभा घेत महाराष्ट्रात निवडणुका लढण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.(HT_PRINT)
(2 / 4)
Telangana Chief Minister KCR In Nanded : देशात भारत राष्ट्र समितीचं सरकार आल्यास प्रत्येक दलित कुटुंबाला दरवर्षी १० लाख रुपये देणार असल्याची घोषणा केसीआर यांनी केली आहे.(HT_PRINT)
(3 / 4)
तेलंगण राष्ट्र समिती या राजकीय पक्षाचं नाव बदलून मुख्यमंत्री केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती असं केलं आहे. त्यानंतर आता त्यांनी तेलंगणातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात आगेकूच केली आहे.(HT_PRINT)
(4 / 4)
मुख्यमंत्री केसीआर यांनी जाहीर सभेतून ‘अबकी बार किसान सरकार’, अशी घोषणा देत महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये भारत राष्ट्र समितीचा विस्तार करणार असल्याचे संकेत दिलेत.(HT_PRINT)
(5 / 4)
नांदेडच्या सभेतून मुख्यमंत्री केसीआर यांनी महिला, दलित, शेतमजूर, शेतकरी आणि सामान्य नागरिकाचे प्रश्न मांडले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केसीआर यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.(HT_PRINT)