महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने खास पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये राज ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले असून खास मेसेज दिला आहे.
तेजस्विनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत 'हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा.
इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता !' असे म्हटले आहे.
पुढे तिने या पोस्टमध्ये, 'साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही, किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं तुमच्याविषयीचं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे.तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा! आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे' असे म्हटले आहे.