मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाश अभिनय विश्व सोडणार? का घेतला सगळ्यातून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली...

Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाश अभिनय विश्व सोडणार? का घेतला सगळ्यातून ब्रेक? अभिनेत्री म्हणाली...

May 23, 2024 03:24 PM IST
  • twitter
  • twitter
Tejasswi Prakash: अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने टीव्हीमधून ब्रेक घेतला आहे. ही बातमी चाहत्यांच्या कानावर पडताच अभिनेत्रीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
टीव्हीची प्रसिद्ध ‘नागिन’ अर्थात छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीने टीव्हीमधून ब्रेक घेतला आहे. ही बातमी चाहत्यांच्या कानावर पडताच अभिनेत्रीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, काही चाहत्यांनी असा अंदाजही बांधला की, अभिनेत्रीने आता अभिनयविश्व सोडणार का? आणि ती पडद्यावर दिसणार नाही का?, पण तसं अजिबात नाही. खुद्द तेजस्वीने याचा खुलासा केला आहे. मात्र, अभिनेत्रीने टीव्हीमधून ब्रेक घेतल्याची कबुली दिली आहे.
share
(1 / 5)
टीव्हीची प्रसिद्ध ‘नागिन’ अर्थात छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीने टीव्हीमधून ब्रेक घेतला आहे. ही बातमी चाहत्यांच्या कानावर पडताच अभिनेत्रीच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, काही चाहत्यांनी असा अंदाजही बांधला की, अभिनेत्रीने आता अभिनयविश्व सोडणार का? आणि ती पडद्यावर दिसणार नाही का?, पण तसं अजिबात नाही. खुद्द तेजस्वीने याचा खुलासा केला आहे. मात्र, अभिनेत्रीने टीव्हीमधून ब्रेक घेतल्याची कबुली दिली आहे.(All Photos: Instagram)
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तेजस्वीने सांगितले की, त्याने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला आहे. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘मला वेगवेगळ्या माध्यमांचा शोध घ्यायचा आहे. मी हे जीवनातून अतिशय कठीण मार्गाने शिकले आहे. त्यामुळे मी असे म्हणत नाही आहे की, मी कधीही टीव्ही शो करणार नाही. मी आज जे काही आहे ते टीव्हीमुळेच. टीव्हीच्या माध्यमातूनच मला ओळख मिळाली आहे.'
share
(2 / 5)

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘जेव्हा तुम्ही योग्य टीव्ही शो निवडता आणि त्यात योग्य काम करता, तेव्हा तुम्हाला नक्कीच ओळख मिळते. लोक मला ओळखतात, पण आता त्यांनी मला आणखी वेगळ्या कारणामुळे ओळखावे, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी टीव्हीपासून ब्रेक घेतला आहे.’ तेजस्वीला अद्याप बॉलिवूडमध्ये कोणताही प्रोजेक्ट मिळालेला नाही. त्यामुळे यादरम्यान तिने छोट्या पडद्यावरही ब्रेक घेतल्याची चर्चा आहे.
share
(3 / 5)

बॉलिवूडमधील डेब्यूबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘हो, हे अवघड आहे पण अनेक लोकांनी ते शक्य केले आहे आणि म्हणूनच मला वाटते की, मी देखील ते करू शकते. होय, यासाठी थोडा वेळ नक्कीच लागेल, परंतु ते अशक्य नाही.’ अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, ‘मी मराठी चित्रपटांमध्ये काम करावे, अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा आहे.’
share
(4 / 5)

तेजस्वी आणि करण कुंद्रा अनेकदा त्यांच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत असतात. दोघेही दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे अनेक फोटो अनेकदा एकत्र दिसतात, ज्यामध्ये चाहत्यांना दोघांची केमिस्ट्री खूप आवडते. सोशल मीडिया युजर्स देखील त्यांच्या जोडीवर खूप प्रेम करतात.
share
(5 / 5)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज