मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  T20 World Cup 2024 : फुटबॉलचा आनंद लुटला, कॅनडाच्या खेळाडूंसोबत मस्ती केली, फ्लोरिडात टीम इंडियाची धमाल

T20 World Cup 2024 : फुटबॉलचा आनंद लुटला, कॅनडाच्या खेळाडूंसोबत मस्ती केली, फ्लोरिडात टीम इंडियाची धमाल

Jun 15, 2024 10:58 PM IST
  • twitter
  • twitter
  • India vs Canada : भारत आणि कॅनडा यांच्यातील T20 विश्वचषक २०२४ सामना रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे मैदान ओले होते. त्यामुळे सामना रद्द करावा लागला.
भारत आणि कॅनडा यांच्यातील T20 विश्वचषक गटातील सामना शनिवारी येथे ओल्या आउटफिल्डमुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. भारताचा हा शेवटचा गट सामना होता. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. तीन सामने जिंकून भारत अ गटातून आधीच सुपर एटसाठी पात्र ठरला आहे. 
share
(1 / 7)
भारत आणि कॅनडा यांच्यातील T20 विश्वचषक गटातील सामना शनिवारी येथे ओल्या आउटफिल्डमुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. भारताचा हा शेवटचा गट सामना होता. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. तीन सामने जिंकून भारत अ गटातून आधीच सुपर एटसाठी पात्र ठरला आहे. 
नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता होणार होती. पण ८ वाजता खेळपट्टीची पाहणी करून पुन्हा ९ वाजता पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
share
(2 / 7)
नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता होणार होती. पण ८ वाजता खेळपट्टीची पाहणी करून पुन्हा ९ वाजता पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.(PTI)
नाणेफेकीला उशीर झाल्यामुळे भारतीय संघाच्या खेळाडूंनी मैदानावर फुटबॉलचा आनंद लुटला. क्रिकेट सामन्यापूर्वी संघ फुटबॉल खेळून सराव करतात. यात कर्णधार रोहित शर्मासह जवळपास सर्वच खेळाडू सहभागी झाले होते. नाणेफेकीची नियोजित वेळ आणि सामना रद्द होण्यात सुमारे अडीच तासांचा कालावधी होता.
share
(3 / 7)
नाणेफेकीला उशीर झाल्यामुळे भारतीय संघाच्या खेळाडूंनी मैदानावर फुटबॉलचा आनंद लुटला. क्रिकेट सामन्यापूर्वी संघ फुटबॉल खेळून सराव करतात. यात कर्णधार रोहित शर्मासह जवळपास सर्वच खेळाडू सहभागी झाले होते. नाणेफेकीची नियोजित वेळ आणि सामना रद्द होण्यात सुमारे अडीच तासांचा कालावधी होता.(PTI)
विशेष म्हणजे, पाऊस असूनही चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर पोहोचले होते. यादरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने चाहत्यांकडे जाऊन त्यांना ऑटोग्राफ दिला. यासोबतच त्यांच्यासोबत फोटो काढले.
share
(4 / 7)
विशेष म्हणजे, पाऊस असूनही चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर पोहोचले होते. यादरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने चाहत्यांकडे जाऊन त्यांना ऑटोग्राफ दिला. यासोबतच त्यांच्यासोबत फोटो काढले.(AP)
कॅनेडियन खेळाडूंसोबत अनुभव शेअर केला-  भारतीय संघातील खेळाडूंनी या वेळी कॅनडाच्या खेळाडूंनाही वेळ दिला. अनेक कॅनडाचे खेळाडू भारतीय कर्णधार रोहित शर्माला बोलताना दिसले. कॅनडाच्या संघातील अनेक खेळाडू भारतीय वंशाचे आहेत.
share
(5 / 7)
कॅनेडियन खेळाडूंसोबत अनुभव शेअर केला-  भारतीय संघातील खेळाडूंनी या वेळी कॅनडाच्या खेळाडूंनाही वेळ दिला. अनेक कॅनडाचे खेळाडू भारतीय कर्णधार रोहित शर्माला बोलताना दिसले. कॅनडाच्या संघातील अनेक खेळाडू भारतीय वंशाचे आहेत.(PTI)
विराट कोहलीसोबत मस्ती - विराट कोहली मजा-मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाही. सामना रद्द होण्याआधी मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. विराट कॅनडाच्या खेळाडूंशी मजा-मस्ती करताना दिसला.
share
(6 / 7)
विराट कोहलीसोबत मस्ती - विराट कोहली मजा-मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाही. सामना रद्द होण्याआधी मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. विराट कॅनडाच्या खेळाडूंशी मजा-मस्ती करताना दिसला.(ANI)
पुढील सामना २० जून रोजी - भारतीय संघाला २० जूनला आपला पुढचा सामना खेळायचा आहे. भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे, ज्याने आतापर्यंत एकाही संघाला १००  धावांचा टप्पा गाठू दिला नाही. सुपर ८ मध्ये भारताला ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर नेदरलँड्स किंवा बांगलादेशला भिडायचे आहे.
share
(7 / 7)
पुढील सामना २० जून रोजी - भारतीय संघाला २० जूनला आपला पुढचा सामना खेळायचा आहे. भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे, ज्याने आतापर्यंत एकाही संघाला १००  धावांचा टप्पा गाठू दिला नाही. सुपर ८ मध्ये भारताला ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर नेदरलँड्स किंवा बांगलादेशला भिडायचे आहे.(ANI)
इतर गॅलरीज