IND vs AUS 2023 : यंदाच्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळं टीम इंडियासह अन्य संघांनी पुढील सामन्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे.
(AFP)टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियन संघात येत्या रविवारी चेन्नईतील एमए स्टेडियमवर सामना रंगणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघाने भगव्या रंगाच्या जर्सीत जोरदार सराव केला आहे. प्रॅक्टिस सेशनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
(AFP)टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मुख्य फलंदाज विराट कोहली यांनी सराव सेशनमध्ये चांगलाच घाम गाळला. हार्दिक आणि बुमराहच्या गोलंदाजीवर विराटने फलंदाजी केली आहे.
(AFP)इशान किशन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, बुमराह, सिराज आणि हार्दिक पांड्या यांच्याबरोबर विराट कोहलीने चांगलीच मौजमस्ती केली. यावेळी अनेक खेळाडू आनंदी असल्याचं दिसून आलं.
(AFP)येत्या रविवारी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. संघाचे दोन्ही सराव सामने पावसामुळं रद्द झाल्याने टीम इंडियाकडून मैदानावर दररोज सराव करण्यावर भर दिला जात आहे.
(AFP)