IND vs AUS : पर्थमध्ये इतिहास घडवणारी टीम इंडिया ॲडलेडमध्ये पराभूत का झाली? ही तीन मोठी कारणं समजून घ्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs AUS : पर्थमध्ये इतिहास घडवणारी टीम इंडिया ॲडलेडमध्ये पराभूत का झाली? ही तीन मोठी कारणं समजून घ्या

IND vs AUS : पर्थमध्ये इतिहास घडवणारी टीम इंडिया ॲडलेडमध्ये पराभूत का झाली? ही तीन मोठी कारणं समजून घ्या

IND vs AUS : पर्थमध्ये इतिहास घडवणारी टीम इंडिया ॲडलेडमध्ये पराभूत का झाली? ही तीन मोठी कारणं समजून घ्या

Dec 08, 2024 01:09 PM IST
  • twitter
  • twitter
  • India vs Australia 2nd Test Day : भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात विजयाने केली, पण कांगारूंनी ॲडलेडमध्ये रोहित अँड कंपनीचा १० गडी राखून पराभव केला. अशा परिस्थितीत पर्थचे हिरो ॲडलेडमध्ये झिरो कसे ठरले आणि भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणे जाणून घेऊया.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. पर्थमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाने ॲडलेडमध्ये शरणागती पत्करली. हा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला गेला. पिंक बॉलसमोर भारतीय फलंदाज असहाय्य दिसत होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
twitterfacebook
share
(1 / 6)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. पर्थमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाने ॲडलेडमध्ये शरणागती पत्करली. हा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळला गेला. पिंक बॉलसमोर भारतीय फलंदाज असहाय्य दिसत होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला गेला, ज्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवला. पर्थमध्ये गोलंदाजांसोबतच फलंदाजांनीही विजयात मोलाचे योगदान दिले. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीने शतके झळकावली, तर जसप्रीत बुमराहने ८ विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत पर्थचे हिरो ॲडलेडमध्ये झिरो कसे ठरले आणि भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणे जाणून घेऊया.
twitterfacebook
share
(2 / 6)
या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला गेला, ज्यात भारताने २९५ धावांनी विजय मिळवला. पर्थमध्ये गोलंदाजांसोबतच फलंदाजांनीही विजयात मोलाचे योगदान दिले. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीने शतके झळकावली, तर जसप्रीत बुमराहने ८ विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत पर्थचे हिरो ॲडलेडमध्ये झिरो कसे ठरले आणि भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणे जाणून घेऊया.(AFP)
१) या कसोटीत नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले, मात्र रोहितने मधल्या फळीत खेळण्याचा निर्णय घेतला. रोहित पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ धावा करता आल्या. रोहितने सलामीला येऊन मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारख्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
twitterfacebook
share
(3 / 6)
१) या कसोटीत नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले, मात्र रोहितने मधल्या फळीत खेळण्याचा निर्णय घेतला. रोहित पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ धावा करता आल्या. रोहितने सलामीला येऊन मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारख्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.(AP)
२) ॲडलेड कसोटीच्या दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी धावा काढण्याचा प्रयत्न केला नाही. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या फलंदाजांची तुलना केली तर फरक सहज दिसून येईल. ट्रॅव्हिस हेडने झटपट धावा करत शतक झळकावले. तर भारतीय फलंदाज जरा जास्तच बचावात्मक दिसले.
twitterfacebook
share
(4 / 6)
२) ॲडलेड कसोटीच्या दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी धावा काढण्याचा प्रयत्न केला नाही. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या फलंदाजांची तुलना केली तर फरक सहज दिसून येईल. ट्रॅव्हिस हेडने झटपट धावा करत शतक झळकावले. तर भारतीय फलंदाज जरा जास्तच बचावात्मक दिसले.(AFP)
नितीश कुमार रेड्डी मुक्तपणे खेळला आणि दोन्ही डावात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याच्यासारखा खेळ इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने दाखवला नाही.
twitterfacebook
share
(5 / 6)
नितीश कुमार रेड्डी मुक्तपणे खेळला आणि दोन्ही डावात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याच्यासारखा खेळ इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने दाखवला नाही.(AP)
) ॲडलेड कसोटीत भारतीय गोलंदाजांनाही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. गोलंदाजांना त्यांच्या रणनीतीनुसार गोलंदाजी करता येत नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. एकीकडे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बहुतांशी भारतीय फलंदाजांना शिस्तबद्ध पद्धतीने बीट करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे भारतीय गोलंदाज बहुतांशी आऊटर लाईनवर गोलंदाजी करताना दिसले. पर्थमध्ये गोलंदाजांची योजना अगदी वेगळी होती, पण ॲडलेडमध्ये ते कुचकामी दिसले.
twitterfacebook
share
(6 / 6)
) ॲडलेड कसोटीत भारतीय गोलंदाजांनाही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. गोलंदाजांना त्यांच्या रणनीतीनुसार गोलंदाजी करता येत नसल्याचे स्पष्टपणे दिसत होते. एकीकडे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बहुतांशी भारतीय फलंदाजांना शिस्तबद्ध पद्धतीने बीट करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे भारतीय गोलंदाज बहुतांशी आऊटर लाईनवर गोलंदाजी करताना दिसले. पर्थमध्ये गोलंदाजांची योजना अगदी वेगळी होती, पण ॲडलेडमध्ये ते कुचकामी दिसले.(AP)
इतर गॅलरीज