Team India : टीम इंडियाला दुलीप ट्रॉफीमधून मिळणार ५ सुपरस्टार, यावर्षी दोन खेळाडू डेब्यू करू शकतात?-team india is going to get 5 super stars from 2024 duleep trophy two players can debut this year ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Team India : टीम इंडियाला दुलीप ट्रॉफीमधून मिळणार ५ सुपरस्टार, यावर्षी दोन खेळाडू डेब्यू करू शकतात?

Team India : टीम इंडियाला दुलीप ट्रॉफीमधून मिळणार ५ सुपरस्टार, यावर्षी दोन खेळाडू डेब्यू करू शकतात?

Sep 08, 2024 06:27 PM IST
  • twitter
  • twitter
  • यंदाचे दुलीप ट्रॉफी २०२४ चे सुरुवातीचे दोन सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांचा निकाल लागला आहे. यावेळची दुलीप ट्रॉफी खूपच खास आहे, कारण यावेळी टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. याशिवाय असे काही खेळाडू आहेत जे भविष्यात टीम इंडियामध्ये दिसू शकतात.
येथे आपण अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे टीम इंडियाचे लवकरच टीम इंडियात दिसू शकतात आणि सुपरस्टार बनू शकतात.
share
(1 / 6)

तनुष कोटियन- फिरकी अष्टपैलू तनुष कोटियन अष्टपैलुत्वाने समृद्ध आहे. तो जितका शानदार गोलंदाजी करतो तितकाच तो एक अप्रतिम फलंदाजही आहे. कोटियन हा परिपक्व अष्टपैलू खेळाडू आहे. तो आगामी काळात टीम इंडियात स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो. कोटियन हा दुलीप ट्रॉफीमधील भारत-अ संघाचा भाग आहे.
share
(2 / 6)

हर्षित राणा- वेगवान गोलंदाज हर्षित राणा चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यात पटाईत आहे. आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीनंतर हर्षित राणाला पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये देशाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. राणा अद्भुत प्रतिभेने समृद्ध आहे. हर्षित राणा दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-डीकडून खेळत आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात त्याने ४ विकेट घेतल्या. हर्षित राणाही या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.
share
(3 / 6)

यश दयाल-  डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याने आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. मात्र, यश दयाल रेड बॉल फॉरमॅटमध्ये त्याहूनही धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. यूपीचा यश दयाल २०२४ दुलीप ट्रॉफीमध्ये भारत-बी संघाचा भाग आहे. यशने पहिल्या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या,.यश लवकरच टीम इंडियात पदार्पण करू शकतो.
share
(4 / 6)

 अभिषेक पोरेल- विकेटकीपर फलंदाज अभिषेक पोरेल आयपीएल २०२४ मध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीने प्रसिद्धी झोतात आला. तो दुलीप ट्रॉफीमधील भारत सी  संघाचा भाग आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात पोरेलने ३४  आणि नाबाद २५ धावांची खेळी खेळली. भविष्यात पोरेल टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज बनू शकतो.
share
(5 / 6)

मुशीर खान- मुशीर खान २०२४ दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया-बी कडून खेळत आहे. मुशीरने भारत अ संघाच्या शक्तिशाली गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध १८१ धावांची शानदार खेळी खेळून बरीच प्रसिद्धी मिळवली. मुशीरचे टॅलेंट पाहता तो भविष्यात टीम इंडियाचा सुपरस्टार बनू शकतो. १९ वर्षांचा मुशीर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार फलंदाजी करत आहे.
share
(6 / 6)

इतर गॅलरीज