
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा विशेष पर्व स्वातंत्र्याचा अमृतोत्सव म्हणून साजरा केला जात आहे, सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे आणि देशाचा कानाकोपरा तिरंग्याने व्यापला आहे. स्वातंत्र्याच्या या सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचे सदस्यही सहभागी झाले असून ते देशवासियांचे अभिनंदन करत आहेत.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीही स्वातंत्र्याच्या जल्लोषात सामील झाला आहे. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत तिरंगा फडकवला.
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंशिवाय त्यांच्या कुटुंबानेही स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मानेही पारंपारिक लूकमध्ये फोटो शेअर केले आणि चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजानेही देशाच्या स्वातंत्र्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जडेजा सध्या ब्रेकवर आहे आणि आता तो थेट आशिया कपमध्ये पुनरागमन करणार आहे.
बॉर्डर गावस्करर ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार अजिंक्य रहाणेनंही भारतीयांना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवरवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गच सचिन तेंडुलकरनेही आपल्या घरी तिरंगा फडकवला. तसेच, सचिनने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. हार्दिक पांड्या पारंपारिक लूकमध्ये असून तो तिरंगा फडकावताना दिसत आहे.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुकताच सोशल मीडियावर त्याचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. आता त्याची पत्नी साक्षी सिंह धोनीनेही तिचा डीपी बदलून चाहत्यांना स्वांतत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



_1660550647154.jpg)


_1660551502253.jpg)