टीम इंडियाने १० वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली. यानंतर खेळाडूंनी तुफान जल्लोष केला. टीम इंडियाच्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. विजयानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळाडूंसाठी खास भाषण केले.
(1 / 5)
टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप २०२४ चे विजेतेपद पटकावले. ही ट्रॉफी जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हे स्वप्न साकार केले. (BCCI X)
(2 / 5)
या विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये चांगलेच भावनिक वातावरण होते. यावेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची भाषणे झाली.
(3 / 5)
महत्त्वाची बाब म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या दोन्ही खेळाडूंनी विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये भाषण केले. खेळाडूंचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.(BCCI X)
(4 / 5)
विराट कोहली ट्रॉफीला किस करताना दिसला. कोहलीने आता T20 इंटरनॅशनलला अलविदा केला आहे. अंतिम सामन्यात त्याने ७६ धावांची शानदार खेळी केली. (BCCI X)
(5 / 5)
टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडूंनी ट्रॉफीसोबत त्यांचे फोटो क्लिक केले. वर्ल्डकप ट्रॉफी विजयाचा खरा हिरो जसप्रीत बुमराहनेही ट्रॉफीसोबत पोझ दिली.(BCCI X)