मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs PAK : भारताला केवळ ८ टक्के संधी होती, तर ९२ % सामना पाकच्या बाजूने होता, पण बुमराहने सामना फिरवला

IND vs PAK : भारताला केवळ ८ टक्के संधी होती, तर ९२ % सामना पाकच्या बाजूने होता, पण बुमराहने सामना फिरवला

Jun 10, 2024 02:48 PM IST
  • twitter
  • twitter
  • IND vs PAK T20 World Cup 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला पराभूत करून आश्चर्यकारक कामगिरी केली. सध्या सर्वत्र फक्त टीम इंडियाचीच चर्चा होत आहे. भारतीय संघाने पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.
न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर बाबर आझमने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. यानंतर बाबरच्या गोलंदाजांनी भारताच्या दिग्गज फलंदाजांना १९ षटकात अवघ्या ११९ धावांत गारद केले. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना त्यांचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते.
share
(1 / 6)
न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर बाबर आझमने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. यानंतर बाबरच्या गोलंदाजांनी भारताच्या दिग्गज फलंदाजांना १९ षटकात अवघ्या ११९ धावांत गारद केले. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांना त्यांचा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते.(PTI)
पण भारतीय गोलंदाजांनी तसे होऊ दिले नाही. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांचा राहिला, दोघांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांनी हातातून गेलेला सामना परत आणला.
share
(2 / 6)
पण भारतीय गोलंदाजांनी तसे होऊ दिले नाही. भारताच्या विजयात सर्वात मोठा वाटा जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांचा राहिला, दोघांनी अनुक्रमे ३ आणि २ बळी घेतले. भारतीय गोलंदाजांनी हातातून गेलेला सामना परत आणला.(ICC- X)
पण तुम्हाला माहित आहे, का की या सामन्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा भारताच्या विजयाची शक्यता फक्त ८% होती. तर पाकिस्तान सामना जिंकण्याची शक्यता ९२ टक्के होती. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अशी अप्रतिम कामगिरी केली की, ९२ टक्के विजयाची शक्यता असणाऱ्या पाकिस्तानला सामना गमवावा लागला. या विजयासह टीम इंडियाने संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला.
share
(3 / 6)
पण तुम्हाला माहित आहे, का की या सामन्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा भारताच्या विजयाची शक्यता फक्त ८% होती. तर पाकिस्तान सामना जिंकण्याची शक्यता ९२ टक्के होती. पण, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अशी अप्रतिम कामगिरी केली की, ९२ टक्के विजयाची शक्यता असणाऱ्या पाकिस्तानला सामना गमवावा लागला. या विजयासह टीम इंडियाने संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला.(ANI)
भारत-पाकिस्तान सामन्यात हे अनेकदा पाहायला मिळते, जिथे सामना प्रत्येक क्षणी बदलतो. यावेळीही तसेच घडले. सुरुवातीला पाकिस्तान हा सामना सहज जिंकणार हे स्पष्ट होते, पण शेवटी टीम इंडियाने बाजी मारली. 
share
(4 / 6)
भारत-पाकिस्तान सामन्यात हे अनेकदा पाहायला मिळते, जिथे सामना प्रत्येक क्षणी बदलतो. यावेळीही तसेच घडले. सुरुवातीला पाकिस्तान हा सामना सहज जिंकणार हे स्पष्ट होते, पण शेवटी टीम इंडियाने बाजी मारली. (AP)
२०२२ च्या T20 विश्वचषकातही असेच काहीसे घडले होते, जिथे भारताच्या विजयाची शक्यता केवळ ३.४% होती, परंतु त्यानंतर किंग कोहलीने टीम इंडियाला विजयी केले होते.
share
(5 / 6)
२०२२ च्या T20 विश्वचषकातही असेच काहीसे घडले होते, जिथे भारताच्या विजयाची शक्यता केवळ ३.४% होती, परंतु त्यानंतर किंग कोहलीने टीम इंडियाला विजयी केले होते.(AP)
सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव- T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव श्रीलंकेने केला होता. सर्व प्रथम श्रीलंकेने २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकूण १२० धावांचा बचाव करून विजय मिळवला होता. आता टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध १२० धावांचे टार्गेट डिफेंड करून सामना जिंकला.  
share
(6 / 6)
सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव- T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव श्रीलंकेने केला होता. सर्व प्रथम श्रीलंकेने २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकूण १२० धावांचा बचाव करून विजय मिळवला होता. आता टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध १२० धावांचे टार्गेट डिफेंड करून सामना जिंकला.  (REUTERS)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज