Teachers's Day 2024 : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये शिक्षकांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला देखील उतरल्या होत्या. चला जाणून घेऊया या कलाकारांच्या भूमिकांविषयी...
(1 / 6)
शिक्षक दिन हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी प्रत्येकजण आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपल्या शिक्षकांना चांगले आयुष्य लाभावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. शिक्षक दिनाच्या खास दिवशी आम्ही आता तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये शिक्षकांची कथा दाखवण्यात आली आहे. कलाकारांनीही या भूमिका योग्य पद्धतीने निभावल्या…
(2 / 6)
विद्या बालनने शकुंतला देवी या चित्रपटात प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट केवळ शकुंतला देवीच्या बुद्धिमत्तेचेच प्रदर्शन करत नाही तर तिला एक आई आणि एक स्त्री म्हणून समाजात मिळणार मान देखील दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील विद्याच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली.(instagram)
(3 / 6)
'हिचकी' चित्रपटात राणी मुखर्जीने टॉरेट सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. हे असे पात्र आहे जे आपल्या सर्वांना आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला आवडेल. हा चित्रपट एका स्त्रीची प्रेरणादायी कथा आहे.(instagram)
(4 / 6)
तारे जमीन परमध्ये आमिर खानने पहिल्यांदा शिक्षकाची भूमिका साकारली होती. तो राम शंकर निकुंभ या कला शिक्षकाची भूमिका साकारतो. एका तरुण मुलाला, इशानला, डिस्लेक्सियावर मात करण्यास आणि त्याच्या खऱ्या क्षमतेचा स्वीकार करण्यास मदत करतो.(instagram)
(5 / 6)
विकास बहल दिग्दर्शित 'सुपर ३०' हा चित्रपट बिहारचे प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. हृतिक रोशनने हे पात्र अतिशय योग्य पद्धतीने साकारले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला पडला होता.(instagram)
(6 / 6)
शाहिद कपूरने 'पाठशाळा' मध्ये राहुल उदयवार या संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. जो विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांशी चांगला संवाद साधतो आणि शाळेतील समस्यांविरोधात आवाज उठवण्याची प्रेरणा देतो.(instagram)