हैदराबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंत पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आज या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. १४ एप्रिल २०१६ रोजी या पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली होती. हा पुतळा जमीनीपासून १७५ फूट उंच आहे.
(twitter)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा देशातला सर्वात उंच पुतळा आहे. ही मूर्ती २ एकर परिसरात तयार करण्यात आली असून याचा तळ ५० फूट आहे, याची रुंदी ४५.५ फूट आहे. तर यात ७९१ टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.
(twitter)नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी या मूर्तीची रचना करण्यात आली आहे. यासाठी १४६.५० कोटी इतका खर्च आला असून जवळपास ४२५ मजूर यासाठी झटले आहेत. पद्मभूषण पुरस्कारप्राप्त शिल्पकार राम वानजी सुतार यांनी हा पुतळा बनवला आहे. आंबेडकरांचे स्मारकही ३६ एकरांच्या विस्तीर्ण जागेत असून, इथे एक रॉक गार्डनही बांधण्यात आले आहे.
(twitter)मुख्य प्रवेशद्वार, पाण्याचे कारंजे, GRC, ग्रॅनाइट फ्लोअरिंग, लिफ्ट सुविधा. बाबासाहेबांच्या प्रतीमेपर्यंत जाण्यासाठी जिना आणि रॅम्प बांधण्यात आला आहे. प्रतीमेच्या खालच्या आवारात एक वाचनालय उभारण्यात आले आहे, जिथे बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत केलेल्या कामांची माहिती उपलब्ध आहेत.
(twitter)