Taiwan Earthquake Death toll rises : बुधवारी पहाटे तैवानला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ज्यामुळे अनेक इमारती कोसळल्या. या भूकंपामुळे जपानी बेटांवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भयंकर भूकंपात ७ ठार तर ७,७०० जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
(1 / 10)
तैवानमध्ये बुधवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान सात जण ठार तर अनेक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती भुईसपाट झाल्या आहेत. भूकंपामुळे त्सुनामी येण्याचा इशारा देण्यात आला आहे, या भूकंपाचे धक्के, चीन, जपान आणि फिलीपिन्सपर्यंत बसले. (AFP)
(2 / 10)
तैवानमध्ये बुधवारी झालेल्या मोठ्या भूकंपात मृतांची संख्या सात झाली आहे. तर जखमींची संख्या ७, ७३६ वर पोहोचली आहे. (Bloomberg)
(3 / 10)
राष्ट्रीय विधानमंडळ, द्वितीय विश्वयुद्धापूर्वी बांधण्यात आलेली रूपांतरित शाळेची भिंती आणि छत या भूकंपामुळे कोसळले आहेत. (AFP)
(4 / 10)
हुलेईन मधील अनेक इमारती या कोसळल्या आहेत. तर शहरातील अनेक इमारत या ४५ अंशाच्या कोनाने झुकल्या आहेत. (AP)
(5 / 10)
जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की भूकंपानंतर सुमारे मिनिटांनी योनागुनी बेटाच्या किनाऱ्यावर सेंटीमीटर (सुमारे १ फूट) त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या. (AP)
(6 / 10)
गेल्या २५ वर्षांच्या काळात आज झालेला भूकंप सर्वात शक्तिशाली होता. तैवानचा सर्वात भीषण भूकंप २१ सप्टेंबर १९९९ रोजी झाला होता. त्याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल नोंदवली गेली होती. यात २ हजार ४०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे १ लाखहूं अधिक नागरिक जखमी झाले होते. तर हजारो इमारती नष्ट झाल्या होत्या. (AP)
(7 / 10)
तैवानच्या भूकंप निरीक्षण संस्थेने आज झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल नोंदवली. तर यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने ती ७.४ रिश्टर स्केल नोंदवली आहे. हे हुआलियनच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे १८ किलोमीटर (११.१ मैल) अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे ३५ किलोमीटर खोल नोंदवण्यात आला. (AP)
(8 / 10)
तैवानमधील शक्तिशाली भूकंपाला प्रतिसाद म्हणून, भारतीय तैपेई असोसिएशनने स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तैवानमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मदत आणि मार्गदर्शनासाठी हेल्पलाइन जारी करण्यात आली आहे. (AFP)
(9 / 10)
भूकंपाचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात, हुआलियन काउंटी हॉलच्या २५ किमी दक्षिण-पूर्वेस, १५.५ किमी खोलीवर होता, प्रशासनाच्या भूकंप विज्ञान केंद्रानुसार, सेंट्रल न्यूज एजन्सीने अहवाल दिला आहे.(Bloomberg)
(10 / 10)
हुलेईंन शहरात २०१८ मध्ये भूकंप झाला होता. मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आज आलेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहेत. अनेक इतर इमारती कोसळल्या आहेत.