TMKOC: ‘तारक मेहता…’च्या ‘जेठालाल’ने घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्याची भेट! जिलेबी-फाफडासोबत केलं सेलिब्रेशन-taarak mehta ka ooltah chashmah fame jethalal aka dilip joshi meets olympic medal winner aman sehrawat ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  TMKOC: ‘तारक मेहता…’च्या ‘जेठालाल’ने घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्याची भेट! जिलेबी-फाफडासोबत केलं सेलिब्रेशन

TMKOC: ‘तारक मेहता…’च्या ‘जेठालाल’ने घेतली ऑलिम्पिक पदक विजेत्याची भेट! जिलेबी-फाफडासोबत केलं सेलिब्रेशन

Aug 22, 2024 12:44 PM IST
  • twitter
  • twitter
Jethalal Meets Olympic Medal Winner: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे 'जेठालाल' उर्फ दिलीप जोशी यांनी पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता अमन सेहरावतची भेट घेतली आहे.
२६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण सहा पदके जिंकली. यामध्ये एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे.
share
(1 / 7)
२६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण सहा पदके जिंकली. यामध्ये एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे.(Instagram)
पदक जिंकणाऱ्यांमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतच्या नावाचाही समावेश आहे. अमन सेहरावत कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकून भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता ठरला.
share
(2 / 7)
पदक जिंकणाऱ्यांमध्ये कुस्तीपटू अमन सेहरावतच्या नावाचाही समावेश आहे. अमन सेहरावत कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकून भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता ठरला.(Instagram)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम टीव्ही अभिनेता दिलीप जोशी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या अमन सेहरावतची भेट घेतली. अमन सेहरावतने त्याच्या इंस्टाग्रामवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
share
(3 / 7)

अमनच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तारक मेहताचा ‘जेठालाल’ म्हणजेच दिलीप जोशी यांनी कुस्तीपटूला जलेबी-फाफडा भेट दिला. दिलीप जोशी यांनी आपल्या स्टोरीमध्ये अमनची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला आहे.
share
(4 / 7)

अमन सेहरावतने इंस्टाग्रामवर एकूण ६ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिलीप आणि अमन एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यातील एका फोटोत अमन त्याच्या पदकासोबत आणि दिलीपसोबत पोज देताना दिसत आहे.
share
(5 / 7)

हे फोटो शेअर करताना अमनने लिहिले की, ‘आज जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीजींना भेटून मला खूप आनंद झाला. त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये पाहून मला नेहमीच आनंद झाला आहे, मला भेटल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.’
share
(6 / 7)

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर अमनने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोसाठीचं आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. अमन यांना विचारण्यात आले होते की, कुस्तीशिवाय ते मोकळ्या वेळेत काय करतात? या प्रश्नाला उत्तर देताना अमनने सांगितले होते की, मोकळ्या वेळेत ते ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बघतात.
share
(7 / 7)

इतर गॅलरीज