‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना नेहमीच खळखळवून हसवले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. तर, या पात्रांनी देखील प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. ‘गोकुलधाम सोसायटी'मध्ये अगदी डॉक्टर, व्यापारी, लेखक, पत्रकार ते वैज्ञानिक अशी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं राहतात. पण, ही पात्र साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात किती शिकले आहेत, ते तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया…
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे दयाबेन. ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने साकारली आहे. दिशाने अहमदाबादमधून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर तिने गुजरातमधील कॉलेजमधून ड्रामेटिक्सचे शिक्षण घेतले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत तारक मेहता ही भूमिका शैलेश लोढा यांनी साकरली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मालिका सोडली. त्यांचे आणि निर्मात्यांचे वाद सर्वांसमोर आले होते. शैलेश लोढा यांच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी मार्केटिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.
जेठालाल हे नाव जरी घेतले तरी सर्वांसमोर दिलीप जोशी यांचा चेहरा उभा राहातो. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालालचे लाखो चाहते आहेत. जेठालालच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी मुंबईतील केएनएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून बी कॉम केले आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत माधवी भाभी ही भूमिका सोनालिका जोशीने साकारली आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. सोनालिकाच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर तिने इतिहास या विषयात बीए केले आहे.