IND vs ENG T20 World Cup: इंग्लंडचे 'हे' ५ गेम चेंजर, रोहित शर्माचं टेन्शन वाढवणार?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs ENG T20 World Cup: इंग्लंडचे 'हे' ५ गेम चेंजर, रोहित शर्माचं टेन्शन वाढवणार?

IND vs ENG T20 World Cup: इंग्लंडचे 'हे' ५ गेम चेंजर, रोहित शर्माचं टेन्शन वाढवणार?

IND vs ENG T20 World Cup: इंग्लंडचे 'हे' ५ गेम चेंजर, रोहित शर्माचं टेन्शन वाढवणार?

Published Nov 09, 2022 09:32 PM IST
  • twitter
  • twitter
  • India vs England 2nd Semi-Final: T20 विश्वचषक २०२२ मधील दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा उपांत्य सामना १० नोव्हेंबर (गुरुवार) रोजी अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाईल. या सामन्यातील विजेता संघ १३ नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध विजेतेपदासाठी लढेल. पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला हरवून फायनलध्ये एन्ट्री केली आहे.
इंग्लिश संघाविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना टीम इंडियासाठी सोपा असणार नाही. इंग्लिश संघात एकहाती सामने जिंकवून देण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंचा भरणा आहे. याठिकाणी आपण अशाच ५ इंग्लिश खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यापासून भारतीय संघाला सावध राहावे लागेल. या ५ खेळाडूंना टीम इंडियाने व्यवस्थित गुंडाळले तर या सामन्यातील भारतीय संघाचा विजय निश्चित होऊ शकतो.
twitterfacebook
share
(1 / 7)

Jos Butller- इंग्लिश कर्णधार जोस बटलर भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला बटलर यंदा चांगल्याच फॉर्मात आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याची फलंदाजी सर्वांनी पाहिली आहे. सध्याच्या T20 विश्वचषकात बटलरने ४ डावात ११९ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. सुरुवातीच्या षटकांमध्येच जोस बटलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे भारतीय गोलंदाजांचे लक्ष्य असेल.
twitterfacebook
share
(2 / 7)

 Alex Hales: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून सलामीवीर अॅलेक्स हेल्सची बॅट चांगलीच तळपत आहे. हेल्सने चालू स्पर्धेत ४ सामन्यांत एका अर्धशतकासह १२५ धावा केल्या आहेत. अॅलेक्स हेल्स कर्णधार बटलरसह सलामीला येईल. भारतीय संघाने बटलरसह अॅलेक्स हेल्सला लवकर बाद केले तर टीम इंडियाचे काम सोपे होऊ शकते.
twitterfacebook
share
(3 / 7)

Ben Stokes: जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या बेन स्टोक्सपासून भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे. गोलंदाजीत वेग आणि बाऊंसच्या माध्यमातून विरोधी फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता स्टोक्सकडे आहे. त्याचबरोबर फलंदाजीतही तो इंग्लंडसाठी गेम चेंजर ठरू शकतो. बेन स्टोक्सने चालू टूर्नामेंटमध्ये ५ विकेट घेण्यासोबतच बॅटने ५८ धावा केल्या आहेत.
twitterfacebook
share
(4 / 7)

Sam Curran: अष्टपैलू सॅम करनने गोलंदाजीत कमालीची कामगिरी केली आहे. करनने चालू टी-२० विश्वचषकात एकूण ४ डावांत एकूण १० बळी घेतले आहेत. यादरम्यान १० धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याआधी इंग्लंडकडून टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला ५ बळी घेता आले नव्हते. सॅम करन आपल्या स्विंगने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. एवढेच नाही तर करन तुफानी फलंदाजी करण्यासही सक्षम आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)
Sam Curran: अष्टपैलू सॅम करनने गोलंदाजीत कमालीची कामगिरी केली आहे. करनने चालू टी-२० विश्वचषकात एकूण ४ डावांत एकूण १० बळी घेतले आहेत. यादरम्यान १० धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याआधी इंग्लंडकडून टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला ५ बळी घेता आले नव्हते. सॅम करन आपल्या स्विंगने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. एवढेच नाही तर करन तुफानी फलंदाजी करण्यासही सक्षम आहे.(Sam Curran- instagram)
Chris Woakes: अॅडलेड ओव्हलच्या संथ खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स धोकादायक ठरू शकतो. वोक्सकडे नवीन चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये वोक्सविरुद्ध हुशारीने फलंदाजी करावी लागेल. चालू स्पर्धेत वोक्सच्या नावावर एकूण ४ विकेट्सची नोंद आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)
Chris Woakes: अॅडलेड ओव्हलच्या संथ खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स धोकादायक ठरू शकतो. वोक्सकडे नवीन चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये वोक्सविरुद्ध हुशारीने फलंदाजी करावी लागेल. चालू स्पर्धेत वोक्सच्या नावावर एकूण ४ विकेट्सची नोंद आहे.(Chris Woakes-instagram)
India vs England semi final 2
twitterfacebook
share
(7 / 7)
India vs England semi final 2(all photo- instagram)
इतर गॅलरीज