टी-20 विश्वचषक २०२४ चा ७ वा सामना नेपाळ आणि नेदरलँड यांच्यात खेळला गेला. नेपाळ संघ या सामन्यात पराभूत झाला, पण त्यांच्या संघाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांनी सर्वांची मने जिंकली. नेपाळी चाहत्यांनी क्रिकेटला आणि आपल्या खेळाडूंना कसा पाठिंबा देतात, हे जगाला दाखवून दिले आहे.
आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी प्रचंड संख्येने नेपाळी चाहते स्टेडिमयमध्ये जमले होते. कदाचित इतके सामने भारत-पाक सामन्यातही दिसणार नाहीत. स्टेडियमपासून ते नेपाळची राजधानी काठमांडूपर्यंत या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नेपाळच्या चाहत्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये चाहत्यांची गर्दी दिसत आहे.
डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. हा सामना पाहण्यासाठी संपूर्ण स्टेडियम नेपाळी चाहत्यांनी भरले होते.
याशिवाय काठमांडूमधून समोर येणारे फोटोही आश्चर्यकारक आहेत. नेपाळ आणि नेदरलँड यांच्यात खेळला जाणारा सामना पाहण्यासाठी लोक राजधानी काठमांडूमध्ये मोठ्या संख्येने जमले होते.