भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल आगामी टी-२० विश्वचषकात दिसण्याची अपेक्षा होती. आयपीएलच्या चालू हंगामात त्याने नऊ सामन्यात ३७८ धावा केल्या आहेत. केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली लखनौ सुपरजायंट्स १२ गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, त्यानंतरही त्याला भारताच्या टी-२० विश्वचषकातून वगळले.
(AFP)आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या मुख्य संघात रिंकू सिंहची अनुपस्थिती सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी आहे. आयपीएलमध्ये केकेआरसाठी उत्कृष्ट कामगिरी करून त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. मात्र, रिंकू सिंहचे नाव मुख्य संघात नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
(PTI)आयपीएलमधील ९ सामन्यात ४४७ धावा करणारा चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला भारताच्या टी-२० विश्वचषकातून वगळण्यात आले. ऋतुराज चांगल्या फॉर्ममध्ये असताना त्याला संघातून का वगळण्यात आले, यामागचे खरे कारण अद्याप समोर आले नाही.
(AFP)गुजरात टायटन्सचा धडाकेबाज फलंदाज साई सुदर्शनला भारताच्या टी-२० विश्वचषकातून वगळल्याने अनेकांनी बीसीसीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.सुदर्शनला यंदाच्या विश्वचषक संघात स्थान मिळावे, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुदर्शनने गुजरातसाठी १० सामन्यात ४१८ धावा केल्या आहेत.
(AFP)रियान परागने आयपीएल आणि रणजी ट्रॉफीमधील त्याच्या कामगिरीने सर्वांनाच थक्क केले. मात्र, तरीही त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
(AFP)आकाश चोप्रासह अनेक तज्ञांनी टी-२० विश्वचषक संघ तयार करताना टी नटराजनला संधी देण्याची मागणी केली होती. नटराजनने आयपीएलमधील सात सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या, मात्र, विश्वचषकात त्याला संधी देण्यात आली नाही.
(AFP)