IND vs SA Playing 11 : शिवम दुबेचा पत्ता कटणार? विराट नंबर तीनवर खेळणार, फायनलसाठी अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs SA Playing 11 : शिवम दुबेचा पत्ता कटणार? विराट नंबर तीनवर खेळणार, फायनलसाठी अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

IND vs SA Playing 11 : शिवम दुबेचा पत्ता कटणार? विराट नंबर तीनवर खेळणार, फायनलसाठी अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

IND vs SA Playing 11 : शिवम दुबेचा पत्ता कटणार? विराट नंबर तीनवर खेळणार, फायनलसाठी अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

Jun 29, 2024 01:00 PM IST
  • twitter
  • twitter
  • T20 WC 2024 Final Playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 विश्वचषक २०२४ चा विजेतेपदाचा सामना काही तासांतच सुरू होणार आहे. हा विजेतेपदाचा सामना बार्बाडोसच्या ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हलवर रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाईल.
भारताला या स्पर्धेत आतापर्यंत एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. दक्षिण आफ्रिकेनेही आपले सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. या जेतेपदाच्या लढतीतही सर्वांच्या नजरा नाणेफेकीकडे असतील. सामना रात्री ८ वाजता सुरू होईल आणि टॉस त्याच्या अर्धा तास आधी संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
twitterfacebook
share
(1 / 8)

गेल्या ३ सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर-८ च्या पहिल्या सामन्यात रोहितने संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शेवटचा बदल केला होता, ज्यामध्ये मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीप यादव आला होता.
twitterfacebook
share
(2 / 8)

आता विजेतेपदाच्या लढतीत शिवम दुबेच्या रूपाने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियातील बदलामुळे सलामीच्या जोडीमध्येही बदल होऊ शकतात.
twitterfacebook
share
(3 / 8)

वास्तविक, अंतिम सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा शिवम दुबेला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकतो. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापासून दुबे प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे.
twitterfacebook
share
(4 / 8)

अष्टपैलू दुबे आतापर्यंत फक्त फलंदाज म्हणून खेळला आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त १ षटक टाकले. तर दुबेला फलंदाजीत फारशी छाप सोडता आलेली नाही. त्याने फिरकीपटूंविरुद्ध काही मोठे फटके नक्कीच मारले आहेत, पण वेगवान गोलंदाजांसमोरही तो असहाय्य दिसत आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

दुबेचा खराब फॉर्म लक्षात घेता यशस्वी जैस्वालला अंतिम फेरीत संधी मिळू शकते. या T20 विश्वचषकात जयस्वालने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. जयस्वाल प्लेइंग इलेव्हनमध्ये दाखल झाला तर तो रोहित शर्मासोबत सलामीला खेळू शकतो. 
twitterfacebook
share
(6 / 8)

तर आतापर्यंत ओपनिंग करणारा विराट कोहली आपल्या जुन्या नंबर तीनवर येऊ शकतो. आता अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)

फायनलसाठी दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह. दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज