
न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्यांचा पहिला टी-20 विश्वचषक विजय साजरा करण्यासाठी एक सुंदर माओरी भाषेतील गाणे गायले. २०२ ऑक्टोबरच्या रात्री अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर किवी संघाने हे जबरदस्त सेलिब्रेशन केले. यावेळी सामनावीर आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अमेलिया केरने गिटार वाजवले आणि पाठीमागे उभा असलेला संपूर्ण संघ गाणी म्हणत राहिला.
आयसीसीने या सेलिब्रेशनचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, जो सगळ्यांना आवडला आहे. अमेलिया केरने अंतिम सामन्यात फलंदाजीत ४३ धावा केल्या. यानंतर गोलंदाजीत तिने ३ बळी घेत न्यूझीलंडचा दबदबा निर्माण केला. तिने ब्रूक हॅलिडे (३८) सोबत चौथ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ५७ धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
न्यूझीलंडने १५९ धावांचे लक्ष्य दिले होते- प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर न्यूझीलंडने ५ विकेटच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेला ९ बाद १२६ धावाच करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार लॉरा वॉल्वार्डने २७ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले मात्र तिला संघातील इतर फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. न्यूझीलंडकडून अमेलिया केरसोबत रोझमेरी मेयरनेही ३ बळी घेतले. इडन कार्सन, फ्रॅन जोनास आणि हॅलिडे यांना प्रत्येकी एक विकेट मिळालाे.
अमेलिया केरची अष्टपैलू कामगिरी- अमेलिया केरने या सामन्या ३८ चेंडूंच्या खेळीत ४ चौकार मारले तर हॅलिडेने २८ चेंडूंच्या आक्रमक खेळीत ३ चौकार मारले. संघासाठी सुझी बेट्सनेही ३१ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने ३२ धावांचे योगदान दिले.
दक्षिण आफ्रिकेसाठी एन. मलाबाने दोन तर अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन आणि नदिन डी क्लर्कने प्रत्येकी १ विकेट घेतला. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात केली होती, त्यांनी पॉवरप्लेमध्ये बिनबाद ४७ धावा केल्या होत्या.
पॉवरप्लेनंतर आफ्रिकेचा डाव गडगडला- पण पॉवरप्लेनंतर न्यूझीलंडने सामन्यावर पकड घट्ट करण्यास सुरुवात केली. १०व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या अमेलिया केर हिने स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या लॉरा वॉल्वार्ड हिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर ॲन बोश (४ धावा) यष्टिरक्षक गेजकडे झेलबाद झाले.




