या आठवड्यातील शुक्रवार म्हणजेच २२ मार्च हा दिवस सिनेप्रेमींसाठी खूप छान असणार आहे. या दिवशी दोन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. तर एक वेब सीरिज आणि एक चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. होळीचा हा वीकेंड मनोरंजनाने भरलेला असणार आहे.
रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रणदीप हुड्डा याने केले आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
'स्वातंत्र्य वीर सावरकर'ची बॉक्स ऑफिसवर 'मडगाव एक्सप्रेस'शी टक्कर होणार आहे. अभिनेता कुणाल खेमू लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात दिव्येंदू शर्मा, पक्षिक गांधी, अविनाश तिवारी आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत आहेत.
रजनीकांत यांचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट 'लाल सलाम' २२ मार्च रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दिग्दर्शित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याचे बोलले जात आहे.