मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  swargate bus stand : पावसाळ्यापूर्वीच स्वारगेट एसटी आगार तुंबले! प्रवाशांचे होतायेत हाल, पाहा फोटो

swargate bus stand : पावसाळ्यापूर्वीच स्वारगेट एसटी आगार तुंबले! प्रवाशांचे होतायेत हाल, पाहा फोटो

May 21, 2024 08:33 AM IST
  • twitter
  • twitter
  • swargate bus stand : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने या ठिकाणी येणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील ड्रेनेज खराब झाल्याने पाण्याच्या निचरा होत नसून पाणी तुंबत आहे.
पुण्यात स्वारगेट बस स्थानकातून रोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. दर पावसाळ्यात स्वारगेट एसटी (राज्य परिवहन) आगारात अस्वच्छ, साचलेल्या पाण्यातून प्रवास करणे हे  राज्याच्या विविध भागांतून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी नित्याचेच झाले आहे. यावर्षी पाऊस सुरू होण्यापूर्वीच ही परिस्थिती तयार झाली आहे.  
share
(1 / 7)

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने  स्वारगेट एसटी डेपोच्या आतील आणि आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.  पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रवाशांना अस्वच्छ, साचलेल्या घाण पाण्यातून वाट काढावी लागत होती.  
share
(2 / 7)

डेपोच्या आतून आणि आजूबाजूचे पाणी अजूनही कमी झालेले नाही आणि महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन (एमएसआरटीसी) अधिकारी या भागाचा साचलेल्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत जेणेकरुन केवळ प्रवासीच नाही तर पादचारी आणि ये-जा करणाऱ्यांनाचीही डोकेदुखी कमी होईल. 
share
(3 / 7)

बिबवेवाडी वॉर्ड ऑफिसचे सहाय्यक महापालिका आयुक्त प्रदीप आव्हाड म्हणाले, “दरवर्षी स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात पाणी साचते. ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांशी तपासणी केल्यावर आम्हाला आढळले की ही पीएमसीची समस्या नाही. एसटी डेपोची १२  इंची ड्रेनेज लाइन विशेषत: मुसळधार पाऊस असताना मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेण्यासाठी अपुरी ठरले. आम्ही एसटी आगार प्रशासनाला ड्रेनेज लाइन बदलण्यासाठी पत्र लिहिले आहे.  कारण पाणी साचण्याच्या समस्येचा फटका प्रवाशांनाच नाही तर डेपोबाहेरील पादचाऱ्यांनाही बसत आहे.
share
(4 / 7)

पीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने म्हणाले, “स्वारगेट परिसरातील वादळाच्या पाण्याचा निचरा व्यवस्था आम्ही आधीच सुधारली आहे कारण ती सखल आहे. आता डेपोच्या ड्रेनेज व्यवस्थेच्या अपुऱ्यापणामुळे, पाणी बाहेर रस्त्यावर वाहत असल्याने डेपोबाहेरील पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
share
(5 / 7)

एमएसआरटीसीचे पुणे विभागीय नियंत्रक कैलास पाटील म्हणाले, “उन्हाळी सुट्टी सुरू असल्याने एमएसआरटीसीच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बसेस उशिराने धावत आहेत. बाहेरील ड्रेनेज सिस्टिमचे पाणी एसटी स्टँडमध्ये पाठीमागे वाहत असल्याने एसटी स्टँडमध्ये आणि आजूबाजूला पाणी साचले आहे. नागरी अधिकाऱ्यांनी आवश्यक दुरुस्ती करावी.
share
(6 / 7)

मारुती जाधव या प्रवाशाने सांगितले की, “मी रविवारी साताऱ्याहून आलो. मी बसमधून खाली उतरलो तेव्हा गलिच्छ पाण्यामुळे मला चालता येत नव्हते. कसे तरी सामान घेऊन मी स्टँडमधून बाहेर पडण्यात यशस्वी झालो. संदेश मोरे, आणखी एक प्रवासी म्हणाला, “पुणे मेट्रो रस्त्याच्या एका बाजूला मल्टीमॉडल हब बनवत आहे तर दुसरीकडे आम्हाला पाणी साचण्याचा आणि चिखलाचा सामना करावा लागत आहे. या नाण्याच्या दोन बाजू आहेत: विकास आणि दुर्लक्ष...” स्वारगेट हे शहरातील सर्वात गजबजलेले एसटी आगार आहे ज्यामध्ये दररोज ५०,००० हून अधिक प्रवासी MSRTC बसने प्रवास करतात आणि दररोज ६०० हून अधिक बस येजा करत असतात.   
share
(7 / 7)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज