Swaminarayan Mandir Festival Jalgaon In Marathi : जळगाव शहरातील टीव्ही टॉवर परिसरात नयनरम्य असे स्वामीनारायण मंदिराची स्थापना करण्यात येत असून, या ठिकाणी श्री स्वामी नारायण भगवान यांची २०२ वर्षे पूर्वीची मूर्ती स्थापन करण्यात येत आहे. जाणून घेऊया या मंदिराचे खास आकर्षण…
(1 / 5)
श्री स्वामीनारायण हे सहजानंद स्वामी म्हणूनही ओळखले जाणारे, एक योगी आणि तपस्वी होते ज्यांना अनुयायांकडून कृष्णाचे किंवा पुरुषोत्तमाचे सर्वोच्च प्रकटीकरण मानले जाते, ज्यांच्याभोवती स्वामीनारायण संप्रदाय विकसित झाला. जळगाव शहरातील टीव्ही टॉवर परिसरातही नयनरम्य असे स्वामीनारायण मंदिराची स्थापना करण्यात येत आहे.
(2 / 5)
श्री स्वामीनारायण भगवान हे भारताची परिक्रमा करीत असताना ते बऱ्हाणपुर मार्गे भुसावळ, जळगाव, अमळनेर, धुळे व मालेगाव मार्गे गुजरातला गेले होते. २०० वर्षांपूर्वी ते जळगावला आले असल्याचे सांगितले जात आहे.
(3 / 5)
वर्ष २०१६ पासून मंदिर निर्माण कार्याला सुरवात करण्यात आली असून, जळगाव महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ ८०००० घनफूट बन्सी पाड दगडात श्री स्वामीनारायण मंदिर उभारण्यात आले आहे.
(4 / 5)
नूतन स्वामीनारायण मंदिराचे लोकार्पण १५ डिसेंबर रोजी होणार असून, या लोकार्पणानिमित्त येथे १७ डिसेंबरपर्यंत भागवत सप्ताह सुरू आहे.
(5 / 5)
मंदिराला मुख्य शिखरासह ११ शिखर असून, महाराष्ट्रातील ऐतिहासिक अद्भुत मंदिराची उभारणी यामध्ये केली आहे. यात १०८ स्तंभ, ६० कमानी, मुख्य घुमट, भगवान विष्णूचे २४ अवतार, ५७ गणपती मूर्ती वेगवेगळ्या भावमुद्रांमध्ये कोरण्यात आले आहे.
(6 / 5)
मंदिरात विठ्ठल रुक्मिणी, शिव, हनुमान, श्री गणेश, शारदाम देवतांचे दर्शन भाविकांना करता येणार आहे. तसेच ५४ फूट उंच असलेली दगडातील श्री हनुमान यांची भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे.