ज्योतिषीय गणनेनुसार सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे ७ फेब्रुवारी रोजी षडाष्टक योग तयार होणार आहे. अशावेळी सूर्य आणि मंगळाच्या संयोगाने तयार झालेला षडाष्टक योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल हे जाणून घेऊया.
मेष :
ज्योतिषीय गणनेनुसार मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि मंगळाची युती अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवर मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. परदेश प्रवासाची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह :
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि मंगळाची युती अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे. व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. काही मोठ्या आर्थिक योजना राबविल्या जातील, ज्यामुळे मोठा नफा होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. कामाच्या ठिकाणी बॉसची मदत मिळेल.
धनु :
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि मंगळाची युती भाग्यशाली ठरणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ अतिशय अनुकूल राहील. या दरम्यान तुम्ही काही महत्त्वाची कामे करू शकता. बहुतांश बाबतीत यश मिळेल. नोकरदारांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील. संपत्तीत वाढ होईल.