Surya Gochar: सूर्याची बुध आणि राहूशी युती झाली आहे. याचा परिणाम सर्व राशींवर नक्कीच होणार आहे. याचे काही राशींना शुभ फळ मिळणार असले, तरी सूर्याच्या या गोचरामुळे काही राशींसाठी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.
(1 / 5)
सूर्य देव हा नऊ ग्रहांचा स्वामी आहे, तो महिन्यातून एकदा आपली स्थिती बदलतो, प्रत्येक वेळी तो आपले स्थान बदलतो, सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे, सूर्य देवाच्या संक्रमणाचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो.
(2 / 5)
सूर्याने १४ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे. बुध आधीच मीन राशीत गोचर करत आहे. त्याचबरोबर आता भगवान राहूही संक्रमण करत आहेत.
(3 / 5)
या स्थितीत सूर्यदेवाची भगवान बुध आणि भगवान राहू यांच्याशी युती होणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर नक्कीच होईल. काही राशींना शुभ फळ मिळणार असले, तरी सूर्यदेवाच्या या गोचरामुळे काही राशींसाठी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घेऊया ‘या’ कोणत्या राशीचे आहेत.
(4 / 5)
कर्क : सूर्यदेवाच्या संक्रमणामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्याही कामाकडे अधिक लक्ष देणे चांगले. व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नवीन प्रकल्प टाळणे चांगले. व्यवसायात भागीदारांसोबत अडचणी येण्याची शक्यता आहे.
(5 / 5)
तूळ : सूर्याचे गोचर तुम्हाला समाधान देणार नाहीये. विविध प्रकारच्या इच्छा पूर्ण न होण्याची दाट शक्यता आहे. या काळात नवीन गुंतवणूक करणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. व्यवसायात मंदी राहील.
(6 / 5)
धनु : सूर्य आपल्या राशीला संमिश्र परिणाम देणार आहे. अध्यात्मात रुची निर्माण होईल. वैयक्तिक जीवनात अधिक संयम बाळगणे चांगले. या काळात वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची दाट शक्यता आहे. आपल्या पालकांसोबत काही वाद होऊ शकतात.