Sun Transit In Aquarius In Marathi : कुंभ संक्रांत हा सूर्य आणि शनिदेवाशी संबंधित सण आहे. कारण या दिवशी सूर्य शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करतो. या दिवशी या दोन्ही ग्रहांशी संबंधित वस्तूंचे दान करावे. यामुळे शनीचा कोप दूर होतो असे सांगितले जाते.
कुंभसंक्रांतीला लोक पवित्र नदीत स्नान करतात आणि दान देतात. या दिवशी दान केलेल्या वस्तूंचे अचूक फळ मिळते. यावर्षी कुंभसंक्रांतीला महाकुंभात अमृतस्नानही आहे.
कुंभ संक्रांतीला कपडे दान करा पण लक्षात ठेवा की, दान देण्याचे कपडे फाटलेले किंवा उसवलेले असू नयेत. उपयुक्त, चांगले आणि स्वच्छ कपडेच नेहमी दान करा. जेव्हा वाईट गोष्टींचे दान करतो तेव्हा शनिदेव कोपतो असे सांगितले जाते.
कुंभसंक्रांतीच्या दिवशी तेलदान करणे शुभ मानले जात नाही. यामुळे शनीच्या अशुभ परिणामाला सामोरे जावे लागू शकते आणि व्यक्तीला प्रगती, वैवाहिक जीवन आणि नोकरीत अडचणींचा सामना करावा लागतो.
कुंभसंक्रांतीला लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे टाळावे. शास्त्रांमध्ये याला अशुभ मानले जाते. त्याऐवजी तांबे किंवा पितळी सामानाचे दान करा.