Surya and Mangal Yuti 2024 : ग्रह-नक्षत्राच्या बदलाच्या स्थितीचा राशींवर प्रभाव पडतो. सूर्य व मंगळ ग्रहाच्या युतीमुळे ३ राशींना लाभ होणार आहे. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.
(1 / 6)
ग्रहांचा राजा सूर्य १५ जानेवारीला मकर राशीत विराजमान झाला आहे. १३ फेब्रुवारी पर्यंत सूर्यदेव याच राशीत राहील. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. अशात सूर्य व मंगळ ग्रह यांची युती होईल. सूर्य-मंगळ युतीचा ३ राशींना फायदा होईल. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.
(2 / 6)
सूर्य ग्रह आत्मा, यश, मान-सन्मान, राजा, उच्चपद यांचा कारक ग्रह आहे. पाच वर्षांनी सूर्य आणि मंगळ मकर राशीत भेटतील. ही युती ५ फेब्रुवारी २०२४ ला होणार आहे.
(3 / 6)
मंगळ हा अग्नि ग्रह असून, सूर्य आणि मंगळाच्या संयोगाने आदित्य मंगळ योग तयार होत आहे. यामुळे मेष, वृषभ आणि सिंह राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील.
(4 / 6)
मेषमेष राशीला व्यवसायात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल. तुम्ही नवीन यश निर्माण कराल. पदावर असलेल्यांना बढतीची संधी आहे. वैवाहिक जीवन चांगले होईल.
(5 / 6)
सिंहसिंह राशीला शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळेल. कुटुंबासोबत आध्यात्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. व्यवसायात चांगला नफा मिळेल.
(6 / 6)
वृषभवृषभ राशीच्या लोकांना शिक्षणाशी संबंधित बाबतीत चांगली प्रगती लाभेल. तुमचे आरोग्य सुधारेल. पदावर असलेल्यांना बढतीची चांगली शक्यता आहे. मुलांच्या उपक्रमांमुळे आनंद लाभेल. सुवर्ण संधी मिळेल. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)