Suriya Birthday: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सूर्याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या भावाने पोस्ट शेअर केली आहे. आता सूर्याचा भाऊ कोण चला जाणून घेऊया...
(1 / 4)
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता सूर्याचा आज २३ जुलै रोजी वाढदिवस आहे. चाहते सूर्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करताना दिसत आहेत. अशातच सूर्याच्या भावाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. आता सूर्याचा भाऊ कोण तुम्हाला माहिती आहे का? चला पाहूया…
(2 / 4)
सूर्या त्याचा ४९वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यानिमित्ताने त्याचा भाऊ आणि अभिनेता कार्तिकने देखील पोस्ट शेअर केली आहे. त्याने ट्विटरवर, 'शुन्यातून सुरुवात करुन इथपर्यंत पोहोचला आहेस' असे म्हटले आहे.
(3 / 4)
पुढे कार्तिकने 'जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेता आणि त्यासाठी स्वत:ला शोकून देता तेव्हा तुम्हाला यश मिळते. माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा' असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
(4 / 4)
सूर्याचा भाऊ कार्तिक देखील तामिळचा सुपरस्टार आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट सूर्याप्रमाणे हिट होताना दिसतो.
(5 / 4)
लवकरच कार्तिक गंगुवा चित्रपटात पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार आहे.